Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
अल्पवयीन गर्भवती मुलीने घेतले विष; युवकास अटक; अत्याचाराचा गुन्हा दाखल
Aapli Baatmi October 16, 2020

बेलोरा (जि. अमरावती ) ः अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सात महिन्याच्या गर्भवती युवतीने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिरीष बंड (वय 28) असे अत्याचार, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक दीपक वळवी यांनी सांगितले. पीडित मुलीच्या आईने चांदूरबाजार ठाण्यात तक्रार दिली. शिरीषने पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वारंवार भेटी घेऊन त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.
हेही वाचा – आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स
11 ऑक्टोबरला पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे पालकांनी तिला उपचारासाठी चांदूरबाजारच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पीडित गर्भवती असल्याचे कळते. पीडितेच्या आईने शिरीषला जाब विचारला असता त्याने अल्पवयीन मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाला आपण जबाबदार नसल्याचे सांगितले. मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने विषारी औषध प्राशन केले. असे तिच्या आईने पोलिसात दाखल तक्रारीत म्हटले.
त्यानंतर तिला आधी इर्विन रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविले. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी शिरीष बंड विरुद्ध अत्याचारासह, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
ठळक बातमी – पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा
पीडितेसह तिच्या आईला तक्रार नोंदविण्यासाठी आधीच सांगितल्या गेले होते. गुन्हा दाखल झाल्याने आवश्यक तपास केल्या जाईल.
– दीपक वळवी,
पोलिस निरीक्षक, चांदूरबाजार ठाणे.
संपादन – अथर्व महांकाळ
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023