Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
रेवंडे घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
Aapli Baatmi October 16, 2020

सातारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. एका बाजूने कोरोनाचे संकट आणि दुसऱ्या बाजूने परतीच्या पावसाचे संकट यामुळे सर्वचजण हतबल झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाची संततधार सुरुवात होती. गुरुवारी काही उसंत घेतली असली तरीही परळी खोऱ्यात पावसाचा जोर तसाच कायम होता. शुक्रवारी पहाटे रेवंडे येथील घाटातील दरड पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेवंडी घाट हा धोकादायक स्थितीत असलेल्या पैकी एक घाट आहे.
काेयनासह, धाेम, उरमाेडी, तारळी, कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग
अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, रस्त्यावर असलेले महाकाय दगड यामुळे याठिकाणी डांबरी रस्ता होऊनदेखील बससेवा अजूनही सुरू नाही. त्यातच दरड पडल्याने रेवंडेसह भागातील गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे, तरी संबंधितांनी लवकरात-लवकर ही दरड हटवून रस्ता वाहतुकीस पूर्वपदावर आणावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023