Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
अतिवृष्टीच्या तडाख्यात आरफळचा कॅनोल फुटला
Aapli Baatmi October 16, 2020

विसापूर : अतिवृष्टीच्या तडाख्याने आरफळ कॅनोल तब्बल चार ठिकाणी फुटला आहे. कॅनॉल मधुन पाणी बाहेर पडल्याने भराव खचून हा प्रकार घडला. पाण्याचा प्रचंड प्रवाह बाहेर पडल्याने परिसर जलमय झाला. त्यामुळे काही शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेली दोन दिवस पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले भरभरून वाहत आहेत. विसापूर परिसरातील आरफळ सह ताकारी कॅनोल मधून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. विशेष म्हणजे आरफळच्या कॅनॉल मध्ये ताकारी सह परिसरातील ओढ्याचे व माळावरून वाहत आलेल्या नाल्याचे पाणी मिसळल्याने कॅनोल दुथडी भरून वाहत आहे.
आरफळ कॅनोल काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी जमिनीला समांतर आहे. जिथे खोलगट भाग आहे तिथे पाणी पुढे सरकले मात्र जमिनीला समांतर असलेल्या ठिकाणी पात्राबाहेर पडले. एकीकडे प्रचंड पाण्याचा दबाव व त्याचबरोबर दुसरीकडे साठलेले पाणी त्यामुळे पाणी कॅनॉलच्या बाहेर पडले. त्यामुळे पाण्याने कॅनॉलच्या आजूबाजूचा भराव पूर्णपणे खचला. अखेर विसापूर ते तासगाव रोड, चिंचणी येथे दोन ठिकाणी व नागाव येथे अशा चार ठिकाणी आरफळ चा कॅनॉल फुटला. ही माहिती मिळताच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उप अभियंता आर. एम. धोत्रे व शाखा अभियंता जी. ए. तिरमारे यांनी तातडीने भेट दिली. विसापूर पुणदी पंप हाऊस व चिंचणी पूलाजवळ अशा दोन ठिकाणी पाणी कॅनॉल मधून बाहेर काढले. तसेच जवळ वस्तीतील लोकांना अन्यत्र जाण्यास सांगितले.
ताकारी कॅनॉलचे पाणी तसेच ओढे-नाले मधुन वाहून आलेल्या पाण्याने कॅनॉल पूर्ण भरला. त्यामुळे पाणी बाहेर पडुन भराव खचल्याने कॅनॉल फुटला. पाऊस थांबल्यानंतर तातडीने दुरुस्त करण्यात येणार येईल. ताकारीचे मिसळणारे पाणी बंद करू.”
– जी. ए. तिरमारे, शाखा अभियंता
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The canal of Arfal burst due to heavy rains
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023