Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
बारवी धरण प्रकल्पग्रस्त २०९ वारसांना नोकरी
Aapli Baatmi October 17, 2020
बदलापूर – आपली बातमी वृतसेवा
शुक्रवारी दि १६ ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतितीगृहात ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रातिनिधिक सहा जणांना राज्याचे उद्योग मंत्री व मुरबाडचे आमदार श्री किसन कथोरे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीसाठीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील २०९ तरुणांना एकाच वेळी महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळात नोकरीच्या मध्यामातुं सामावून घेतल्याने एकाच वेळी प्रकल्प पीडितांना नोकरी देऊन महाराष्ट्रात इतिहास घडल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली. अनेक वर्ष आपल्या हक्कासाठी व न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पीडितांच्या चेहऱ्यावर समाधान व डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा व्हावा या साठी या सर्व प्रकल्पग्रस्तांनी जो त्याग केला त्या त्यागाची जाणीव ठेऊन महाराष्ट्र आद्योगिक महामंडळाने ठेवली असेही श्री कथोरे यांनी या वेळी आपली बातमी शी बोलतांना सांगितले. या कार्यक्रमासाठी उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरे महामंडळाचे सचिव अन्बलगनतसेच इतर मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांना आपली जमीन व घर सोडतांना काय यातना होतात हे मी स्वतः प्रकल्पग्रस्त असल्याने अनुभवले आहे व त्यामुळेच एकाही प्रकाल्प्ग्रस्ताला न्याय पासून वंचित राहू देणार नाही हि खुणगाठ घेऊनच काम करत आलो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना हा निर्णय घेतल्याने हे शक्य झाले असे आमदार श्री किसन कथोरे यांनी सांगितले.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023