Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सांगलीकरांची घटस्थापनेच्या तयारीची लगबग
Aapli Baatmi October 17, 2020

सांगली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवाला शनिवार (ता. 17) पासून प्रारंभ होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बाजारपेठेवर कोरोनाचे सावट असताना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवार दिवसभर बाजारपेठेत नवरात्र तयारीसाठी रस्त्यावर गर्दी होती. सायंकाळी मारुती चौक, विश्रामबाग परिसरासह इतर भागात रस्ते गर्दीने फुलले होते. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे भान ठेवून ग्राहक व विक्रेत्यांचा व्यवहार सुरु असल्याचे चित्र होते.
यंदा गुढीपाडव्यापासून सुरु असलेले कोरोना विषाणूचे शुक्लकाष्ठ सर्वच सण समारंभावर परिणाम घडवून गेले. गणेशोत्सवही जेमतेम साजरा झाला. सार्वजनिक मंडळांनी प्रथमच मुर्ती प्रतिष्ठापनेला बगल देत साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला. त्यानंतर आलेल्या नवरात्रोत्सवावरही कोरोनाचा परिणाम जाणवतो आहेच. मात्र कोरानाने मृत्युमुखी पडणारी संख्या व नवे बाधित रुग्ण यात उतार येत आहे. गेल्या आठवड्यापासून यात कमालीचा फरक जाणवत असल्याने दिलासा मिळत आहे.
शहरात काही ठिकाणी नवरात्रीचा उत्साह दांडगा असतो. गरबा, दांडिया उत्तरोत्तर रंगत जातो. सार्वजनिक मंडळांमार्फत देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करुन नऊ दिवस भक्तिभावाने हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यापासून काही ठिकाणी मंडप उभारणीची तयारी सुरु होती.
पूजा साहित्याला मागणी
शनिवारी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्य तसेच उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. माती, झेंडू फुले, विविध धान्ये, मडकी, रांगोळी, पत्रावळी, सुगड, धूप, अगरबत्ती यासह पूजा साहित्याला उठाव होता.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023