Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पहाटेचा थरार! पोलिसांचा संशय बळावताच सुरु झाला सिनेस्टाईलने पाठलाग; अखेर त्यांनी डाव साधलाच
Aapli Baatmi October 17, 2020

नाशिक : (अंबासन) बागलाण तालुक्यातील घटना…पोलिसांना भनक लागली होतीच. युवकांनीही कामात खारीचा वाटा दिला. पोलिसांनी वाहनाचा पाठलागही केला. मात्र रस्त्यातील दगडगोटे ओलांडत त्यांनी धुम ठोकलीच. वाचा काय घडले?
अशी आहे घटना
बागलाण तालुक्यातील करंजाड येथील विंचूर प्रकाशा महामार्गावर शुक्रवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास अवैद्यरित्या जनावरे वाहतूक करणारे वाहन जात असल्याची गुप्त माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी करंजाड येथील सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे यांना भ्रमणधनीवर माहीती वाहनांची माहिती दिली. पोलिसांनी शासकीय वाहनातून अवैद्यरित्या जनावरे वाहतूक करणारे वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू केला. दरम्यान श्री. देवरे यांनी तातडीने बबन देवरे, गणेश पवार, पप्पू पवार व पंकज खैरनार यांना घेऊन करंजाड रस्त्यावर सदर वाहन अडविण्यासाठी दगडगोटे टाकले. ताहाराबादकडून भरधाव वेगाने जनावरे वाहतूक करणारे वाहनाने दगडगोट्यावर धडक देत सुसाट वेगाने मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे सदर वाहन पलटी होता होता वाचले होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तरूणांनी विरगाव गावापर्यंत वाहनांचा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू केला मात्र अपयशी ठरले.
हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!
या अवैद्यरित्या जणावरे घेऊन जाणा-या वाहनांवर वरदहस्त कुणाचा याबाबत चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर दगडगोटे टाकून अडविण्याचा प्रयत्न केला. तरीही सुसाट वेगाने रस्त्यावरील दगडगोट्यावरून वाहन चालवून फरार झाले. पोलिस प्रशासनाने कठोरपणे कार्यवाही करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.
हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023