Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल
Aapli Baatmi October 17, 2020

बेलोरा (जि. अमरावती): अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्या मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा गावात घडली असून मुलीवर सध्या इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिरीष बंड (वय 28), असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शिरीषने पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वारंवार भेटी घेऊन त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. 11 ऑक्टोबरला पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे पालकांनी तिला उपचारासाठी चांदूरबाजारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पीडित गर्भवती असल्याचे समजले. पीडितेच्या आईने शिरीषला जाब विचारला असता त्याने अल्पवयीन मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाला आपण जबाबदार नसल्याचे सांगितले. मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला आधी इर्विन रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविले. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी शिरीष बंडविरुद्ध अत्याचारासह, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – रस्त्यावरील खड्डे नव्हे हे तर यमदूतच, जागोजागी उखडली…
पीडितेसह तिच्या आईला तक्रार नोंदविण्यासाठी आधीच सांगितले होते. गुन्हा दाखल झाल्याने आवश्यक पुढील तपास केला जाईल.
– दीपक वळवी, पोलिस निरीक्षक, चांदूरबाजार ठाणे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl physical abused in belora of amravati
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023