Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बेळगावातील नव्वद नवदुर्गा
Aapli Baatmi October 17, 2020

बेळगाव : शहरात अनेक मंडळे असून, ती आपल्यापरीने सामाजिक कार्य करीत आहेत. पटवर्धन ले आऊट येथील सुवासिनी महिला मंडळ गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. वर्षभर कार्यरत असणाऱ्या सुवासिनी महिला मंडळाने कोरोना काळातही विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.
पटवर्धन ले आऊट परिसरात मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर विद्या तोपिनकट्टी व सीए वनिता बिर्जे यांनी पुढाकार घेऊन २०१४ मध्ये मंडळाची स्थापना केली. त्यानंतर मंडळाच्या सभासदांची संख्या वाढत गेली. सध्या मंडळाच्या सभासदांची संख्या ९० असून, मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य शिबिरे व विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.
दिवाळी सणावेळी अनाथाश्रमाला फराळ व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. तर पुढील शिक्षण घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यातही हे मंडळ पुढे आहे. महिला मंडळाच्या सभासदांना भजनाचे धडे देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला. तीन वर्षांपासून मंडळाचे सभासद शंकर पाटील भजनाचे धडे देत आहेत. त्यामुळे मंडळाचे भजनी मंडळ तयार झाले असून, विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्याबरोबरच शारीरिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. कोरोनाकाळात स्वच्छता कर्मचाऱ्यांना चहा व नाश्त्याचे वाटप करण्यात आले होते. सध्या मंडळाच्या अध्यक्षपदी नंदिनी चौगुले, उपाध्यक्ष वृंदा तडकोड, खजिनदार विद्या तोपिनकट्टी असून, ऐश्वर्या पाटील, आरती वेर्णेकर, अपर्णा भंडारी, सोनाली बिर्जे आदी सभासद आहेत.
हेही वाचा – मी नवदुर्गा : बेवारस आणि गरीब रुग्णांवर स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करणाऱ्या बेळगावच्या रणरागिणीची कहाणी –
“मंडळाची स्थापना झाल्यापासूनच विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम मंडळातर्फे केले जात आहे. आगामी काळात मंडळातर्फे अनेक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. मंडळाचे भजनी मंडळ असून गेल्या तीन वर्षांपासून याबाबतचे धडे घेतले जात आहे.”
– विद्या तोपिनकट्टी, खजिनदार
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023