Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
BMC आयुक्त इकबालसिंह चहल यांची देशातील सर्वात प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांमध्ये नोंद
Aapli Baatmi October 17, 2020

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.मुंबईतील कोविड नियंत्रणात आणण्याची जागतिक पातळीवर यापुर्वीच दखल घेण्यात आली असून काही दिवसांपुर्वीच त्यांना आय,सीसी कोव्हिड क्रुसेडर 2020 पुरस्कारने गौरविण्यात आले होते.
दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
फेम इंडिया या मासिकाने कोव्हिड काळात प्रभावी काम करणाऱ्या देशभरातील 50 सनदी अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.त्यात,मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह वन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचाही या यादीत समावेश आहे. उत्कृष्ट प्रशासक,निर्णय क्षमता, व्यवहार कुशलता अशा सात विविध पातळ्यांचा अभ्यास करुन ही यादी तयार करण्यात आली आहे. देशातील 1984 ते 1995 या काळात आयएएस झालेल्या 200अधिकाऱ्यांमधून ही यादी तयार करण्यात आली आहे.
भारताची ऐश्वर्या श्रीधर “वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर’
काही दिवसांपुर्वीच इंडो अमेरीका चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे त्यांना आय, सीसी कोव्हिड क्रुसेडर 2020 पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कोव्हिड काळात संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मुंबई महानगर पालिकेचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.जागतिक आरोग्य संघटना,जागतिक बँकेने गौरव केला असून फिलीपाईन्सच्या वस्त्यांमध्येही धारावी पॅटर्न राबवला जात आहे
——————————————-
( संपादन – तुषार सोनवणे )
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023