Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
बारामतीमध्ये तोतयाचा पराक्रम; अजित पवारांचे नाव घेत दिली बांधकाम व्यावसायिकाला धमकी
Aapli Baatmi October 17, 2020

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वापरुन मुंबईतील बांधकाम व्यावसायिकास धमकाविणा-यास शहर पोलिसांनी आज अटक केली. मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तुषार तावरे (रा. तारांगण सोसायटी, बारामती) यास पोलिसांनी अटक केली.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले की, अजय कामदार यांना तुषार तावरे याने फोन करुन मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आली आहे, ती तुम्हाला व्हॉटसअँपवर पाठवली आहे ती बघण्यास सांगितले. या तक्रारीवर तत्काळ कारवाई करावी असा शेरा मारुन पोलिस उपआयुक्त झोन 9 तसेच सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना रिमार्क मारुन त्या खाली उपमुख्यमंत्री यांची सही असल्याचे कामदार यांना दिसले. या नंतर कामदार यांनी घाबरुन तुषार तावरे याच्याशी संपर्क साधला असता तुमच्याविरुध्द दिलेला अर्ज मी कमीशनर यांच्याकडे पाठविला नसून माझ्याकडेच ठेवला आहे, तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या, नाहीतर तुमच्या विरुध्द कारवाई होईल, असे तावरे याने धमकावले.
चोरट्यांची ‘छप्पर फाड के’ चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला
या नंतर कामदार यांनी थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून याची चौकशी केल्यानंतर तुषार तावरे नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचे सांगितले. अजित पवार आज बारामतीत असून त्यांनाच हा प्रकार सांगा, असे सांगितले गेले. त्या नंतर कामदार यांनी बारामती गाठत पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांची भेट घेतली. त्या नंतर मुसळे यांनी कामदार यांना तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्या नंतर कामदार यांनी शहर पोलिसात तुषार तावरे याच्या विरोधात फिर्याद दिली.
मास्क न घातल्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसाच्या पायावर पठ्ठ्यानं घातली दुचाकी
दरम्यान तुषार तावरे याने अन्य कोणाची उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने फसवणूक केली असल्यास बारामती शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023