Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सारं होत्याचं नव्हतं झालं : चार वेळा अतिवृष्टी, हजार मिलिमीटर पावसाचा तडाखा
Aapli Baatmi October 18, 2020

आटपाडी (जि. सांगली) : बॅंका विकास सेवा सोसायट्या आणि वेळ प्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने हजारो शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, झेंडू, ढबू मिरचीसह विविध भाजीपाला आणि फळ पिकांनी माळराने फुलवली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार वेळा अतिवृष्टी आणि विक्रमी हजार मिलिमीटर पावसाच्या तडाख्याने सारं होत्याचं नव्हतं झालं. तालुक्यात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शेती, शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे.
दुष्काळी म्हणून आटपाडीची ओळख आहे. कमी पाऊस नेहमीचाच. शेतकरी कमी पाण्यात येणारी पिके घेतात. डाळिंब हुकमी पिक. अलीकडे टेंभूचे पाणी आल्याने द्राक्ष, ढबू मिरची, शेवगा, मका, झेंडू आणि इतर भाजीपाल्याचे क्षेत्र चांगलेच वाढले.
मृगात जून, जुलैमध्ये बहुतांश डाळिंबाच्या भागाचा हंगाम धरला. सर्व प्रकारच्या भाजीपाला, झेंडूची लागवडही केली होती. कमी पाण्यात येणारी पिके असताना जून पासून पावसाची संततधार आहे.
एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली. तीन वेळात 100 मिलिमीटर वर एकाच वेळी पाऊस कोसळला. साऱ्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले. पिके पाण्याखाली गेली. डाळिंब बागांत गुडघाभर पाणी साचून राहिले. मोठ्या प्रमाणात फळकुजवा, फळगळ सुरु झाली. बघता बघता झड रिकामी झाली. उशिराने झालेल्या बागांची फुलगळ झाली. डाळींबासह सर्व शेतांत पाझर लागलेत. डाळिंबात मर रोग वाढला आहे. द्राक्षाची 500 हेक्टरवर क्षेत्र आहे. हंगाम धरण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टीत सारे काही वाहून गेले. द्राक्ष, डाळिंब बागांना घातलेली खते वाहून गेली. ढबू मिरची, शेवगा, भुईमूग, बाजरी, झेंडू हिप क्रिकेटर रानात सोडून आणि कुजत चाललीय. शेतकऱ्यांनी केलेला लाखोंचा खर्च वाया गेला.
अनेक ठिकाणी ओढा पात्राचे पाणी शेतातून गेले आहे. अडीचशे हेक्टर क्षेत्र पाण्याने वाहून गेलेय. ओढ्यात असलेल्या पाईप, मोटारी, वायर आणि आणि कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. सागर तलाव, साठवण तलाव, नालाबांध, बंधारे, शेकडो विहिरी गाळाने बुजल्या आहेत.
रब्बी हंगामातील पेरण्या धोक्यात
सततच्या पावसामुळे शेतात आणि पाणी साचला आहे. अनेक शेतांना पाझर लागले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या धोक्यात आले आहेत. पाणी आटून आणि पाझर थांबून तनक केव्हा काढायची आणि पेरण्या कधी होणार?, सारे अंधारात आहे.
नुकसान झालेले क्षेत्र(अंदाजे)
- डाळिंब- 7 ते 9 हजार हेक्टर.
- द्राक्ष-500 हेक्टर.
- मूग, बाजरीचेचे क्षेत्र-25 हजार हेक्टर.
- वाहून गेलेले शेत-250 हेक्टर.
- झेंडू-500 हेक्टर.
- ढबू मिरची-500 हेक्टर.
- गाळाने भरलेल्या विहिरी-150.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023