Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नांद्रे येरळा नदीवरील रेल्वे पुलाचा भराव वाहून गेला; कोयना, महाराष्ट्र रद्द
Aapli Baatmi October 18, 2020

मिरज, भिलवडी (जि. सांगली) ः मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे (ता.मिरज) येथील येरळा नदीवरील रेल्वे पुला नजिकचा काही भाग पाण्याच्या अति प्रवाहामुळे वाहून गेल्याने कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना, कोल्हापुर-गोंदिया ऐक्स्प्रस आज (ता.16 ते 19 पर्यंत रद्द केली. तर निजामद्दीन, यशवंतपूर, मडगाव, गोवा ऐक्स्प्रेस पंढरपुर कुर्डूवाडी मार्गे सोडण्यात येणार आहेत. तर आज ता.16 रोजी धावणारी गोंदिया महाराष्ट्र-कोल्हापूर एक्स्प्रेस सातारा स्थानकांपर्यंतच धावली. यामुळे कराड, भिलवडी, सांगली, मिरज जयसिंगपूर या माठ्या स्थानकावरील प्रवाशांची तारांबळ उडाली. पुन्हा त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला.
गेली आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. दुष्काळ भाग म्हणून संबोधल्या जाणा-या जत तालुक्यात धुवॉधार पाऊस झाला. यामुळे नांद्रे येथील येरळा नदी प्रथमच दुथडी भरून वाहू लागल्याने येथील पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला. यामुळे मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या कुर्डुवाडी मार्गांनी वळविण्यात आल्या. यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत पुलाच्या डागडुजीचे काम पुर्ण न झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या गाड्या 19 पर्यंत रद्द
या मार्गावरील कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस गाडी क्रमांक (01030), मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस गाडी क्रमांक (01029) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र ऐक्सप्रेस गाडी क्रमांक (01039)गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी क्रमांक (01040) या गाड्या ता.17 ते 19 ऑक्टोंबर पर्यंत धावणार नाहीत. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ता.19 पासून धावेल.
या गाड्या कुर्डुवाडी मार्ग धावतील
निजामुद्दीन-यशवंतपूर गाडी क्रमांक (02630), मडगाव-निजामुद्दीन (02779), निजामुद्दीन-मडगाव (02780), यशवंतपूर-निजामुद्दीन (06523) निजामुद्दीन यशवंतपूर (06524), निजामुद्दीन-वास्को (07380) या गाड्या ता.17 ते 19 ऑक्टोंबर पर्यंत दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर मार्गे मिरजेतून धावतील.
कर्मचा-यांची सतर्कता मोठा अनर्थ टळला
या मार्गावरून सकाळची कोयना एक्स्प्रेस धावणार होती मात्र तत्पुर्वी वेळीच ट्रेकमॅनने पुला संदर्भात कंट्रोल रूमला माहिती दिल्याने पुढील अनर्थ टळला. रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023