Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मेडिकलचा कटऑफ वाढणार; अॅडमिशन आठवड्याभरात होणार सुरू!
Aapli Baatmi October 18, 2020

पुणे : नॅशनल एलिजीबीटी एंट्रन्स टेस्टचा (नीट) निकाल लागल्यानंतर पुढील आठवडाभरात महाराष्ट्रातील 24 शासकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी राज्यात 4 हजार 80 जागा उपलब्ध आहेत.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळाल्याने यंदा विद्यार्थ्यांना चांगेल गुण मिळाले आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या कटऑफ वाढेल. प्राथमिक अंदाजानुसार एमबीबीएसच्या प्रवेशासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कटऑफ 580, तर खासगी महाविद्यालयांचा 560 पर्यंत असू शकेल, असे डीपरचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी सांगितले.
– ‘अंतिम’च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!
राज्यातील 24 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 4 हजार 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 हजार 22 जागा या विशेष कोट्यासाठी आरक्षित आहे. त्यामध्ये 16 जागा भारत सरकार नॉमिनी, 15 टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी 610, डोंगरी भाग 102, दिव्यांग 102, संरक्षण खाते 172 आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा कोट्यासाठी 8 जागा आहेत. तर 3 हजार 58 जागांवर जातीय प्रवर्गानुसार आरक्षण असेल. खुल्या गटातील विद्यार्थ्यांचा ‘स्टेट मेरिट लिस्ट’मध्ये (एसएमएल) साधारणपणे 2 हजार 750 पर्यंत नंबर असेल तर पहिल्या फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. शासकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया एका आठवड्यात सुरू होऊ शकेल, असे बुटले यांनी सांगितले.
– झोमॅटोची ‘आत्मनिर्भर’ डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!
डीपरच्या तीन विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण मिळाले. यामध्ये लातूरचा अभय चिल्लरगे यास 720 पैकी 705, मुंबईचे राहुल कोठारी आणि जयत्र शहा यांना प्रत्येकी 700 गुण मिळाले आहेत, असेही बुटले यांनी सांगितले.
प्रवर्ग आरक्षण व उपलब्ध जागा :-
एसटी – 223
एससी – 413
व्हीजे – 96
इडब्लूएस – 288
एनटी 1 – 79
एनटी 2 – 111
एनटी 3 – 64
ओबीसी-एसबीसी – 604
ओपन – 789
एसईबीसी – 1180
एकूण – 3056
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023