Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मिरज स्थानकाबाहेरील सांडपाणी हटेना; प्रवासी हैराण
Aapli Baatmi October 18, 2020

मिरज (जि. सांगली) : रेल्वे स्थानक स्टेशन रोडवरील सुखनिवास नजिक पोस्ट ऑफिस समोरील ड्रेनेजमधून सांडपाण्याचे कारंजे ऊडू लागले आहे. यातून येणारे सांडपाणी स्थानकाबाहेर साचून गटर गंगा निर्माण झाली आहे.
रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यांवर आठवड्याभरापासून ठाण मांडलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्यास महापालिकेला अपयश आल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधी युक्त पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. एकीकडे दिवसभर पडणारा मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे ड्रेनेजमधून रस्त्यांवर उडणारे सांडपाण्याचे कारंजे यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
अनलॉकनंतर मिरज स्थानकातून सध्या पाच गाड्या धावू लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. मात्र प्रवाशांना सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
तर रेल्वे वसाहत, माणिकनगर, गंगानगर ख्वाजा वस्तीकडे जाणा-या रेल्वे ब्रिज खाली पाच फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे हा मार्ग दिवसभर बंदच होता. यामुळे रेल्वे कर्मचा-यांना मिरज-सांगली मार्गे रेल्वे स्थानकामध्ये नोकरीसाठी हजर रहावे लागत आहे.
यामुळे रेल्वे कर्मचा-यांना रेल्वे बाहेरील सांडपाणी आणि ब्रिज खाली साचलेल्या पाण्यामुळे दुहेरी संकटास तोंड द्यावे लागत आहे. कोल्हापूर रोड, माणिकनगर येथील रेल्वे वसाहतीत पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांची देखिल तारांबळ उडाली आहे.
ब्रिज खाली चार ते पाच फुट पाणी
गंगानगर, माणिकनगर, ख्वाजा वस्ती या ठिकाणी बहुतांश रेल्वे कर्मचारी वासतव्यास आहेत. मात्र गेली अनेक वर्षे येथील रेल्वे ब्रिज खाली पाणी साचत आहे. यातूनच जेष्ठ, अपंग नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. पण आज दिवसभर पाडणा-या पावसामुळे रेल्वे ब्रिज खाली चार ते पाच फुट पाणी साचले आहे. रेल्वे प्रशासनाकडून काहीच मार्ग काढला जात नाही.
– शांताकुमारी संमडेपोगोलू, नागरिक गंगानगर
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023