Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
PHOTOS : बळीराजा संकटात! कांदा चाळीत पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान; आराईत अतिवृष्टीचा फटका
Aapli Baatmi October 18, 2020
नाशिक/आराई : परतीचा सलग आठ तास पाऊस पडल्याने आराई येथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडला. परिसरात जणू ढगफुटी सारखा पाऊस पडला. गेल्या १७ वर्षांत असा पाऊस पडला नाही असे गावकरी सांगत असून, कांदा शेड, मका पीक, चारा तसेच कांदा रोप, कोथींबीर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील आपल्या पीकांची परिस्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
लाखोंचा कांदा भिजला
आराई फाटा येथील दिलीप आहिरे, संजय आहिरे यांचे डी.के.ट्रेडिंग कंपनीच्या कांदा शेड मध्ये पाणी शिरल्याने त्यांनी खरेदी केल्येल्या १०८० क्विंटल कांदा, साधारण ४३,२०००० किंमतीच्या कांदा भरलेल्या गोणी पाण्याने भिजल्या. सध्या मका कापणी व शेतीची कामे, सुट्टी असल्याने मजूर टंचाईमुळे त्याना कांदा लोडींक करता आला नाही. म्हणून त्यांना या नुकसानीला सामोरे जावे लागले.
हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात
त्वरित नुकसानभरपाईची मागणी
तसेच संजय भामरे, दिनेश सोनवणे,काकाजी आहिरे, प्रकाश अहिरे, विलास सोनवणे, रघुनाथ सोनवणे, गोकुळ आहिरे, शिवाजी आहिरे, भिला सोनवणे, राकेश आहिरे यांच्या शेतातील कांदा रोप, चाळीतील कांदा, शेतात कापुन पडलेला मका व मकाचारा पावसाच्या पाण्याने वाहून गेला. तर काही शेतकऱ्यांच्या कांदाचाळी मध्ये पाणी शिरल्याने कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सटाणा मालेगाव रोड वरील सुकडनाला पुलाचे बांधकाम चालू असल्याने शेजारी मातीचा भराव टाकून तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी केलेला पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने तेथली नागरिकांनी पुन्हा जुना पुलं चालू केल्याने वाहतूक सुरळीत झाली यावेळी सरपंच मनीषा आहिरे, डाॅ. गोकूळा आहिरे, उपसरपंच अनिल माळी, माधव आहिरे, तलाठी चव्हाण, ग्रामसेवक सुभाष भामरे तसेच पोलीस पाटील कारभारी भदाने यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केले असून सर्व शेतकऱ्यांनी त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023