Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
विशाल डायरे यांच्या पुढाकाराने बदलापुरात रक्तदान शिबिरात ८५ बाटल्या रक्त संकलित
Aapli Baatmi October 18, 2020
बदलापूर- आपली बातमी वृतसेवा
बदलापूरकरानो सावधान… तुम्हाला जर तात्काळ रक्ताची गरज भासली तर ते मिळेलच याची शक्यता कमी आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबई व ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोबिवली, अंबरनाथ, बदलापूर सारख्या शहरात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे गेल्या ५ महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने या शहरातील रक्तसाठा कमी झालेला आहे.
‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र गेल्या ५ महिन्यापासून मुंबई ठाणे तसेच बदलापुरात रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता या शहरातील रुग्णावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कोरोना पूर्वी दर महिन्याला मुंबई ठाणे व बदलापूर मध्ये रक्तदान शिबीर आयोजित होत होती. गेल्या ५ महिन्याच्या कालावधीत ५० टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी ५० टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर १५ टक्के कॉलेज व ३५ टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र कोरोनामुळे ५ महिन्यात ते मिळाले नाही. गेल्या ५ महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील ५ ते ६ दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे व नेमके ह्याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन बदलापुरातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री विशाल काशिनाथ डायरे यांनी मांजर्ली, बदलापूर येथे आज दिनांक १८/१०/२०२० रोजी शासनाचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करून ८५ बाटल्या रक्त संकलित केल्या बद्दल सर्वच स्तरातून विशाल डायरे याचे कौतुक केले जात आहे, विशाल च्या या कार्या मुळे इतरांना प्रेरणा मिळाली असून आता बदलापुरात काका गोळे प्रतिष्ठान च्या सहकार्याने साखळी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे मिडिया संयोजक श्री मिलिंद धारवाडकर यांनी दिली.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023