Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
बेळगावात एक ब्रास वाळूपासुन बनवली रेणुका देवीची मुर्ती
Aapli Baatmi October 18, 2020

बेळगाव : शहर आणि परिसरातील भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या जत्तीमठ मंदिर येथे वाळुपासुन सौंदत्ती रेणुका देवीची सुबक आणि आकर्षक मुर्ती साकारण्यात आली आहे. त्यामुळे वाळुपासुन बनविण्यात आलेली मुर्ती सर्व भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहे. रामलिंगखिंड गल्ली येथे असलेल्या शंभु जत्तीमठाला मोठा इतिहास असुन गोवा स्वारीवर जात असताना छत्रपती संभाजी महाराजांनी मंदिरात वास्तव्य केले होते.
हेही वाचा – Navratri Special : कोरोना काळात ‘त्या’ बनल्या संकटमोचक –
तेव्हापासुन मराठा समाजाचे जागृत देवस्थान म्हणुन मंदिराला ओळखले जाते. यावेळी कोरोनामुळे मंरिरात दसरा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. मात्र वाळूपासून बनविलेली श्री रेणुका देवीची मूर्ती यावेळी आकर्षणाचे केंद्र ठरली. तानाजी गल्ली येथील वसंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिनाभर परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली आहे.
रेणुका देवीची ही मूर्ती बनविण्यासाठी जवळपास 1 ब्रास वाळूचा उपयोग करण्यात आला आहे. हजारो वर्षापासुन जत्तीमठ असुन पूर्वी या मठात साधू वास्तव करत होते. तसेच दर 12 वर्षांनी एकदा होणाऱ्या कुंभ मेळाव्या देशातील नाथ पंथीय साधू या मंदिराला भेट देतात. नाथ पंथीयांचं वास्तव्य इथे होत असल्याने हे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारणीसाठी केंद्र सरकारतर्फे प्राधान्याने सहकार्य करु’ –
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शहापूर येथील बालाजी देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम सारडा आणि नंदिनी दुधाचे वितरक संजय पाटील यांच्या हस्ते आरती करून पूजा करण्यात आली. यावेळी ट्रस्टी दत्ता जाधव, मदन बामणे, किशोर नारळीकर, मोतेश बारदेशकर व इतर भक्त उपस्थित होते. यापुर्वी महालक्ष्मी, गजलक्ष्मी, गरुढा रुढी लक्ष्मी व यल्लम्मा देवीची विविध पेहरावातील देवीची आरास करण्यात आली होती.
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023