Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पावसाच्या सावटात द्राक्षबागा आणि शेतीकामांची धांदल; हंगामात लाखभर मजुराच्या हाताला काम
Aapli Baatmi October 19, 2020

नाशिक/निफाड : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पूर्ण हंगामभर कोसळलेला पाऊस या परिस्थितीशी दोन हात करत निफाड तालुक्यातील शेतकरी आहे ती हंगामातील पिके वाचवीत आहे. यामुळे बळीराजाची शेती कामांसाठी धांदल उडाली असून द्राक्षबागांसह मका, सोयाबीन खरिपाच्या पिकांच्या सोंगणीसाठी आलेल्या लाखो मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
मोठ्या संख्येने मजूर तालुक्यात दाखल
चालू वर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवात पासून पाऊस कोसळत राहिला. सततचा कोसळणाऱ्या पावसाने शेतात उभी असलेली पिके सडली तर ऊस आडवा झाला, टाकलेले कांदा बियाणे वाया गेले. भाजीपाल्याच्या पिकांची वाताहत झाली. तर द्राक्ष बागाचा उशिराच्या छाटण्यांमुळे हंगाम लांबणीवर पडणार आहे. अशा परिस्थितीशी बळी राजा लढा देत असून आहे ती पिके पदरात पाडून घेण्यासाठी सर्वतोपरी धावपळ करत आहे. दरम्यान निफाड तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीकामांसाठी गुजरातेतील अहवा, डांग, तसेच पेठ सुरगाणा, हरसुलसह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात मजूर तालुक्यात दाखल झाले असून आलेल्या या मजुरांसह स्थानिक मजुरांच्या हातांना काम मात्र मिळाले आहे. तर दुसरीकडे गोदाकाठ परिसरात ऊसतोड हंगाम सुरू होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांचे उऊसतोडणी कामगार डेरे दाखल होत आहे.
हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!
कोरोनाचे संकट असतानाही शेती अन् शेतकऱ्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. सध्या पाऊस असताना देखील निफाड तालुक्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. अशी परिस्थिती असताना देखील अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
– योगेश रायते, द्राक्ष उत्पादक खडकमाळेगाव
हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात
पीक मजुरी दर (एकर)
मका ५०००
सोयाबीन ४०००
द्राक्षबाग छाटणी आणि पेस्ट ५०००
पहिली, दुसरी, तिसरी डिपींग ४०००
फेलफुट ४०००
शेंडाबाळी २०००
इलेक्ट्रोसटटिक ईएसएस १८००
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023