Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
जैन इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईचा प्रस्ताव, शुल्क वसुलीची सक्ती केल्याचा ठपका
Aapli Baatmi October 19, 2020

औरंगाबाद : फी वसुली, शैक्षणिक साहित्य यासह अन्य अनियमितताबाबत शहरातील द जैन इंटरनॅशनल स्कूलवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जि.प. शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक यांना सादर केला आहे. यावर उपसंचालकांकडून काय निर्णय येतो आता याकडे लक्ष लागले आहे. शहरातील शहानूरमियाँ दर्गा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये काही दिवसांपूर्वी पालकांकडून आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात शुल्क भरण्यात यावे, शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांची ऑनलाइन तासिकेची लिंक बंद करण्यात आली होती. तर शाळेतूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत शुल्क वसुलीची सक्ती केली जात नसल्याचे म्हटले आहे.
औरंगाबादच्या टोमॅटोचा देशभर डंका; मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थानात दररोज पन्नास टनाची विक्री
यासंदर्भात पालकांकडून आलेल्या तक्रारींसाठी समिती गठित करून शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत शाळेत असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. यावर आता पुढील दंडात्मक कारवाईसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
संपादन – गणेश पिटेकर
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Of Proposal Against Jain International School Aurangabad News
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023