Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पोलिस निरीक्षकाच्या नावाने पाठविली फ्रेंड रिक्वेस्ट; पत्रकाराने केला धक्कादायक खुलासा
Aapli Baatmi October 19, 2020

नाशिक / विंचूर : शिरसाठ यांना दुधाळ यांच्या फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असता त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर मॅसेंजरद्वारे शिरसाठ यांना ‘मी अडचणीत आहे, मदत करा’, असा हिंदी भाषेतून संदेश पाठविला. त्यानंतर धक्कादायक खुलासा झाला,
असा घडला प्रकार
मुंबई येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नावाने एका भामट्याने बनावट फेसबुक अकाउंट उघडून दुधाळ यांच्या मित्र परिवारास फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली. असाच अनुभव येथील विंचूरचे पत्रकार शिरसाठ यांना आला. शिरसाठ यांना दुधाळ यांच्या फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असता त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर भामट्याने मॅसेजरद्वारे शिरसाठ यांना ‘मी अडचणीत आहे, मदत करा’, असा हिंदी भाषेतून संदेश पाठविला. या वेळी श्री. शिरसाठ यांना हिंदीतून मॅसेज आल्याने संशय येताच त्यांनी श्री. दुधाळ यांना संपर्क करत सर्व माहिती देताच श्री. दुधाळ यांनी हे खोटे अकाउंट असल्याचे शिरसाठ यांना सांगत तत्काळ सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधून संबंधित बनावट अकाउंट लाॅक करत मित्रांची होणारी आर्थिक फसवणूक टाळली.
हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात
पोलिस अधिकाऱ्याचे फेसबुकवर खोटे अकाउंट
मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे फेसबुकवर खोटे अकाउंट उघडून त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार विंचूर येथे उघडकीस आला आहे.
हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023