Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
साखर कारखानदारांना पैसे देता मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना सवाल
Aapli Baatmi October 19, 2020

पंढरपूर (सोलापूर) : राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी करत, सरकारकडे साखर कारखानदारांना देण्यासाठी पैसे आहेत, मग शेतकऱ्यांना देताना आखडता हात का, असा सवाल माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करा; अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि शेट्टी यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पंढरपूर आणि परिसरात अतिवृष्टी झाली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. शेट्टी आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी चिंचोली भोसे, भटुंबरे आदी ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारनेही राज्याला मदत करावी, अशी मागणी केली.
या वेळी शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरे यांनीच शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची द्यावी, अशी मागणी केली होती. आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनीच मदत जाहीर करावी. साखर कारखानदारांना थकहमी देण्यासाठी सरकारकडे कोट्यावधी रुपये आहेत, मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही शेतकऱ्यांची शोकांतिका तर सरकारचे अपयश आहे. राज्य सरकारने केंद्राकडे बोट न दाखवता, राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. जागतिक तापमान वाढीमुळे अतिवृष्टी झाली आहे. केंद्र सरकारने कायमस्वरूपी मदत करण्यासाठी आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र फंड तयार करावा.
चंद्रभागेला आलेल्या महापुरास पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही श्री. शेट्टी यांनी केली.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023