Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
41 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा घोटून आईनेच केला खून
Aapli Baatmi October 19, 2020

सांगली ः देशभर नवरात्रोत्सव सुरु आहे. देवीची आराधना केली जातेय. स्त्रीला नवदुर्गा म्हणून मानपान केला जातोय, मात्र याच धामधुमीत एक हादरवून सोडणारी घटना सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात घडली आहे. मानवी मनाला प्रचंड वेदना देणारी ही बातमी आहे. 41 तासांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या आईने आपल्याच हाताने त्या मुलीचा गळा घोटून खून केला आहे. सुन्न करणाऱ्या या प्रकाराने संपूर्ण सांगली हादरून गेली आहे. ही महिला मूळची बेळगावची असून यामागे नेमके काय कारण घडले, याचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही महिला दोन-तीन दिवसांपूर्वी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. काल शनिवारी तिने एका गोंडस कनेल्या जन्म दिला. भारतभर दुर्गामातेची आराधना केली जात असताना, घटस्थापना होत असताना एका गोंडस मुलीने जन्म घेतला. अन्यत्र, लेकीच्या जन्माचे स्वागत करत, दुर्गा आली घरी असे आनंदाने सांगितले जात असताना या लेकीच्या भाळी मात्र अवघ्या काही तासांत मृत्यू लिहला होता. तोही जिने जन्म दिला त्याच आईच्या हातून… या बातमीने संपूर्ण विश्रामबाग पोलिस ठाणे हादरून गेले. पोलिसांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या महिलेकडे कसून चौकशी सुरु आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mother strangled the girl born 41 hours ago and killed her
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023