Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कृष्णाकाठी पावसाने जमीन ढासळू लागली, पंप गेले वाहून
Aapli Baatmi October 19, 2020

भिलवडी (जि . सांगली) : परतीचा दमदार पावसाने कृष्णाकाठावरील जमिनीचे भाग ढासळून असंख्य कृषिपंप वाहून गेले आहेत.
परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली. सततचा पाऊस व नदीतील वेगाच्या प्रवाहाने काठावरील जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. त्यामुळे काठचे असंख्य कृषी पंप पाण्यात वाहून गेले आहेत.
परिसरात दरम्यान त्याच्या जोडण्या, सक्शन पाईप, वीजपेट्याही गेल्या आहेत. खालचे जमिनीचे भाग तुटून गेल्याने बांधलेली केबिन ढासळली आहेत. काही ठिकाणी तर त्यांचा नामोशिशानही राहिला नाही. पाणी पातळी उतरू लागताच आणखी नुकसानीची भीती आहे. पावसामुळे शेत शिवारात पाणी साठले आहे. पिके कुजू लागली आहेत. उभी पिके आडवी झाली आहेत. नव्या ऊस लागणीची अक्षरश: वाट लागली आहे.
गतवर्षीच्या प्रलयकारी महापुरात नदीकाठी प्रचंड मोठे नुकसान झाले. शेकडो कृषिपंप वाहून गेले, मातीखाली गाडले, काठावरील विजेचे खांब उन्मळून पडले. पिके गेली, जमिनी खचल्या. त्यातून आता कुठे शेतकरी सावरतोय तोच या अस्मानी संकटाने शेतकरीवर्ग पुरता गारद झाला आहे.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023