Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
अवकाळीने शहरातील रस्त्यांची चाळण; कोट्यवधीचे नुकसान; पॅचवर्कची मलमपट्टी
Aapli Baatmi October 19, 2020

सांगली : महापालिका क्षेत्रात झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह गुंठेवारी भाग तसेच नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी घुसून दैना उडाली आहे. वर्षभरापूर्वी आमदार निधी, महापालिकेचा निधी यातून सुमारे कोट्यवधी रुपये खर्चून सांगली, मिरजेतील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने रस्त्यांची अक्षरश: दुरवस्था झाली आहे.
अवकाळी पावसाने चार-पाच दिवस थैमान घातले. शंभर फुटीच्या पलीकडील गुंठेवारी परिसर आणि उपनगरांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. वर्षभरापूर्वी केलेले रस्ते उखडले गेले. शंभर फुटी रस्ता, झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता, सिव्हिल हॉस्पिटल चौक ते राम मंदिर रस्ता, आमराई चौक, शास्त्री चौक, जुना बुधगाव रोड यासह महापालिकेसमोरचा मुख्य रस्ता तसेच मिरजेतील रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. या अवकाळी पावसाने रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. आता तात्पुरती सोय म्हणून या उखडलेल्या रस्त्यांवर पॅचवर्कची मलमपट्टी करण्यात येते.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरोत्थानच्या निधीतून शहरातील अनेक प्रमुख रस्ते करण्यात आले. या योजनेतून आलेल्या 100 कोटींमध्ये सुमारे 70-75 कोटी रुपये रस्त्यांसाठीच खर्च केले. सांगली, मिरजेत युद्धपातळीवर ही कामे करण्यात आली. मात्र, अवकाळी पावसाने या रस्त्यांची दुर्दशा करून महापालिकेचा भोंगळ कारभार यानिमित्त उघडा पाडला.
घरांमध्ये पाणी घुसून नुकसान
जुना कुपवाड रोडवरील महात्मा गांधी कॉलनी, नेहरूनगर, त्याचबरोबर विजयनगरमधील मंगलमूर्ती कॉलनी, आनंदनगर, तुळजाईनगर, ज्ञानेश्वर कॉलनी आदी भागांतील जवळपास 100 हून अधिक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. याचबरोबर संग्रामनगर परिसरात आणि उपनगरांमध्ये पावसाचे पाणी तुंबले. स्थानिक नगरसेवक अभिजित भोसले, तसेच विष्णू माने, राजेंद्र कुंभार यांनी तातडीने महापालिका अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून परिस्थिती दाखवून दिली.
तात्पुरत्या उपायांची मलमपट्टी
आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी विविध उपनगरांना भेटी देऊन पाहणी केली. प्रशासनाने तातडीने आवश्यकतेनुसार मुरूम, चरी मारणे, क्रॉसपाईप आणि पंपाद्वारे पाणी उपसा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच, खराब झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकून पॅचवर्कची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नोटिशीच्या दणक्याने रस्त्याची दुरुस्ती
नगरसेवक अभिजित भोसले यांनी 100 फुटी रस्त्याची दुर्दशा झाल्याबद्दल देखभाल दुरुस्ती अंतर्गत ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी नोटीस प्रशासनाला बजावली. त्यावर तातडीने कार्यवाही करीत 100 फुटी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराने सुरू केले. या रस्त्यावर पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023