Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नांदेड शहरातील पंधरा खासगी कोविड सेंटरमधे केवळ १५१ पॉझिटिव्ह सोमवारी १०१ जण पॉझिटिव्ह पाच मृत्यू
Aapli Baatmi October 19, 2020

नांदेड – जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. सोमवारी (ता. १९) प्राप्त झालेल्या ४१३ अहवालापैकी २८७ निगेटिव्ह आले तर १०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच दिवसभरात २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर चार रुग्णांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटल्याने मागील आठवडाभरापासून शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसल्याने कोविड सेंटर रिकामेच आहे.
रविवारी (ता. १८) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी (ता. १९) १०१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजार १८० इतकी झाली आहे. दुसरीकडे उपचारानंतर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील सात, जिल्हा शासकीय रुग्णालयातील आठ, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल वन आणि होम आयसोलेशन मधील १४२, अर्धापूर- तीन, माहूर -सहा, किनवट – तीन, मुखेड – आठ, देगलूर – दोन, लोहा – दोन या कोविड सेंटरसह खासगी कोविड सेंटरमधील २२ असे २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा- दुष्काळ मदत पाहणीला आमदाराच्या नाराजीची फोडणी
आतापर्यंत ४८८ बाधितांचा मृत्यू
उपचार सुरु असलेल्या बाधित रुग्णांपैकी सोमवारी बसवेश्वर नगर नांदेड पुरुष (वय ५४), देगलूर नाका नांदेड पुरुष (वय ५२), कौठा (ता. कंधार) पुरुष (वय ८२), वडेपुरी (ता. लोहा) पुरुष (वय ७२), शिवाजीनगर कंधार पुरुष (वय ६०) या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरु असताना आतापर्यंत ४८८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचले पाहिजे- राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार
२३० खाटा रिकाम्या
सोमवारी नांदेड महापालिका क्षेत्रात ८८, नांदेड ग्रामीण – तीन, हिमायतनगर – एक, मुदखेड- एक, लोहा – एक, देगलूर – एक, भोकर – एक, माहूर – एक, किनवट – दोन, धर्माबाद – एक व परभणी एक असे १०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १८ हजार १८० वर पोहचली असली, तरी १६ हजार १३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सध्या एक हजार ४४६ बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ४५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णसंख्या घटल्याने विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये ५०, जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर ९० आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय कोविड सेंटरमध्ये ९० अशा २३० खाटा रिकाम्या आहेत.
नांदेड कोरोना मीटर
एकुण कोरोना पॉझिटिव्ह – १८ हजार १८०
आज सोमवारी पॉझिटिव्ह – १०१
एकुण कोरोनामुक्त -१६ हजार १३०
आज सोमवारी कोरोनामुक्त – २१२
एकुण मृत्यू – ४८८
आज सोमवारी मृत्यू – पाच
उपचार सुरु – एक हजार ४४६
गंभीर रुग्ण – ४५
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत – ३७९
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023