Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोंडवेच्या तलाठ्यास लाचप्रकरणी अटक
Aapli Baatmi October 19, 2020

सातारा : जमिनीच्या दस्ताची सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कोंडवे (ता. सातारा) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे (वय 49, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी शेजारी, शाहूपुरी) असे त्याचे नाव आहे. ते कोंडवे सज्जाचे तलाठी आहेत. यातील तक्रारदार याने त्यांच्या जमिनीची विक्री केली होती. त्या दस्ताची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी कोंडवे येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार नोंद करून सात-बारा उतारा देण्यासाठी पेंडसे याने त्यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने आज (सोमवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाडे तक्रार केली होती.
महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांना अटक; नोकरीच्या आमिषातून तिघांना गंडा
तक्रार अर्ज आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी याबाबत तातडीने पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या पडताळणीमध्ये तडजोडी अंती दहा हजार रुपयांची मागणी झाली. ती रक्कम स्वीकारताना पेंडसे याला पकडण्यात आले. कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार संजय साळुंखे, शिंदे, ताटे, खरात हे सहभागी होते. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची कारवाई केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक शिर्के यांनी केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023