Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
साथीचा काळ आणि बापट बाल शिक्षण मंदिर...
Aapli Baatmi October 19, 2020

सांगली : सध्या कोविड आपत्तीकाळात अनेक शाळा-महाविद्यालये मंगल कार्यालयांच्या इमारतींचा वापर होत आहे. आरोग्य जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र याआधी प्लेग,फ्लू आणि टायफॉईडच्या साथीतही असाच काही माहौल होता. सांगलीतील बापट बाल शिक्षण मंदिरची इमारतीत रुग्णालय सुरु झाले होते.
राजवैद्य आबासाहेब सांभारे यांची सांगलीसह सर्वत्र ख्याती होती. सध्या सांभारे गणपतीमुळे त्यांची आठवण सांगलीकरांना राहिली आहे. त्यांचा कालखंड 1868 ते 1933. लोकमान्य टिळकांनाही त्यांनी मधुमेहाचे उपचार दिले होते. 1932-33 च्या प्लेग साथीत लोकांवर उपचार करतानाच त्यांना प्लेगची बाधा झाली. त्यात त्यांचे निधन झाले. त्याकाळात 1934 मध्ये खणभागात मोठ्या प्रमाणात आरोग्य सप्ताह साजरा झाला होता. प्रभात फेरी, आरोग्यविषयक प्रदर्शन, व्यायाम, चित्रपट, आरोग्य पत्रकांचे वाटप असे कार्यक्रम झाले होते. आजच्या सारखी तेव्हाही स्वच्छता मोहिम झाली. दलदलीच्या जागा भरणे, पडीक जागांची सामुहिक स्वच्छता असे उपक्रम झाल्याच्या नोंदी आहेत.
1957-58 मध्ये दोन साथी आल्या. पहिली फ्लूची होती. या साथीचाही वैद्यक क्षेत्राला मोठा ताण आला होता. सांगलीतील सर्व वैद्यक तज्ज्ञांनी साथकाळात सेवा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतली होती. त्यात चारशेंवर तरुण स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. दुसरी साथ कॉलऱ्याची आली होती. यासाठी तत्कालीन नगरपालिकेने बापट बाल शिक्षण मंदिरात तात्पुरता दवाखाना उभा केला होता.
1975-76 मध्ये सांगलीत टॉयफाईडची साथ आली होती. त्यावेळी पुन्हा बापट बालमध्ये दवाखाना थाटला होता. त्यावेळी सरकारी दवाखान्यात इतके रुग्ण झाले की सरकारी दवाखान्याला लोक टायफाईडचा दवाखाना म्हणून लागले. पुढे तापाचा दवाखाना अशीच त्याची ओळख झाली.
सध्या जसे मिरज सिव्हिलला कोविड रुग्णालय म्हणतात तसेच. 1931 मध्ये स्थापन झालेल्या बापट बालच्या स्थापनेमागे सांगली एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांना एक आदर्श अशी प्राथमिक शाळा सुरु करण्याचा मानस होता. तीन मुलांच्या नोंदणीवर सुरु झालेल्या या शाळेत शेकडो सांगलीकरांनी प्राथमिक धडे गिरवले. आता बापट बालला 89 वर्षे झाली. दवाखाना म्हणूनही “बापट बाल’ने कधी काळी सांगलीकरांची सेवा केली आहे. सध्याच्या साथकाळात त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023