Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
महापालिकेत एकहाती सत्ता, स्थायीत बहुमत मग धाकधूक का?
Aapli Baatmi October 19, 2020

सांगली : महापालिकेत एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीत बहुमत आहे. असे असताना सभापतीपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का ? भाजपच्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशा रोखठोक शब्दात माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवकांचा समाचार घेतला.
महापालिकेच्या स्थायी समितीसह सात समित्यांच्या सभापतींची नुकतीच निवड झाली. सत्ताधारी भाजपला सहा सभापतीपदे मिळाली. मात्र या निवडीत सर्वात लक्षवेधी ठरली ती स्थायी समिती सभापती निवडणूक. स्थायीमध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत. तर विरोधी कॉंग्रेस आघाडीचे सात सदस्य आहेत. मात्र काही नाराज सदस्यांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपला आपलाच सभापती होईल, याबद्दल धाकधूक होती. सतत फोनाफोनी सुरु होती. याबद्दल आज श्री. पाटील यांनी सदस्यांसमोर नाराजी व्यक्त केली.
नूतन सभापतींचा सत्कार केल्यानंतर बोलताना ते म्हणाले,””महापालिकेत 43 सदस्य आहेत. स्थायी समितीतही नऊ सदस्य आहेत. मग सभापतीपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का? बहुमत असताना सदस्यांना सहलीला का पाठवावे लागते? याचे शल्य आहे.” आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, नगरसेवक शेखर इनामदार यांनीही मनोगत व्यक्त केले. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी स्वागत केले.
प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांच्या हस्ते स्थायी सभापती पांडुरंग कोरे, महिला बाल कल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत, प्रभाग समित्यांच्या सभापती अप्सरा वायदंडे, लक्ष्मी सरगर, गायत्री कल्लोळी यांचा सत्कार झाला. मकरंद देशपांडे यांची पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख म्हणून निवड केल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. तसेच मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, सुरेश आवटी, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ऍड. स्वाती शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष नगरसेवक धिरज सुर्यवंशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
40 वर्षे गोट्या खेळल्या का ?
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,””राज्यात सत्ता असताना आम्हाला धाकधूक वाटली नाही. पण महापालिकेत का वाटते? याचा विचार करण्याची गरज आहे. कुणी कितीही अडचण केली असती तरी सभापती आमचाच झाला असता. 40 वर्षे आम्ही काय गोट्या खेळल्या का? असा सवाल करत महापौर आणि स्थायी सभापती आम्ही निवडू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023