Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
उजनीत आले 150 टीएमसी तर धरणातून सोडले 77 टीएमसी पाणी
Aapli Baatmi October 20, 2020

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. धरणात पाणी आले किती व धरणातून पाणी सोडले किती याची उत्सुकता जिल्ह्यातील प्रत्येकालाच असते. त्याप्रमाणे यंदा एक जूनपासून आजअखेरपर्यंत धरणात 150 टीएमसी एवढे पाणी आले आहे. त्याचबरोबर धरणातून वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत 77 टीएमसी एवढे पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा उजनीतून पाणी सोडल्याने भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीमध्ये उजनीबरोबरच नीरा नदीचे पाणीही आल्यामुळे भीमा नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली गेली होती. पंढरपूर शहरामध्ये पाणी शिरले होते. पंढरपूर येथील मोठा पूलही पाण्याखाली गेला होता. एवढेच नाही तर बेगमपूर येथील पुलही पाण्याखाली गेले होते. जी स्थिती भीमा नदीची होती तीच स्थिती सीना नदीचीही होती. यापूर्वी ज्याठिकाणी पाणी आले नव्हते, त्याठिकाणी यंदाच्या वर्षीच्या पुलाचे पाणी आले होते. डिकसळ, आष्टे, तिऱ्हे, वडकबाळ याठिकाणचे सीना नदीवरील पुलही पाण्याखाली गेले होते. धरण व्यवस्थापनावर या महाभयानक पुराचे खापर फोडले जात आहे. एका रात्रीत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण करणे पाटबंधारे विभागाला शक्य झाले नाही. मात्र, त्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिके, घरांचे नुकसान झाले आहे. आता नुकसान भरपाईची मागणी जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. पण, अद्यापही शेतकरी व नुकसानग्रस्तांच्या पदरी काहीच पडले नाही.
उजनी धरण 31 ऑगस्टला 100 टक्के भरले होते. त्यानंतर दोन सप्टेंबरला सांडव्यातून, 31 ऑगस्टला कालव्यातून, दोन सप्टेंबरला वीजनिर्मिती, 30 ऑगस्टला बोगद्यातून, 28 ऑगस्टला सीना-माढा उपसा सिंचनमधून तर एक सप्टेंबरपासून दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. अद्यापही धरणातून नदीमध्ये 50 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. उजनी धरणामध्ये जेवढे पाणी बसते तेवढेच पाणी धरणातून पावसाळ्याच्या स्थितीत खाली सोडून द्यावे लागते.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 TMC came in Ujjain and 77 TMC released from the dam
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023