Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
वापरलेले पीपीई कीट आणि मास्क फेकले जातायत उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात
Aapli Baatmi October 20, 2020

मुंबई, ता. 19 : कोरोनातील वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीपीई किट उघड्यावर फेकणाऱ्या नर्सिंग होम तसेच रूग्णालयांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.
अँटॉप हिल सेक्टर 6 मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सीजीएस कॉलनी जवळील सिपीडब्ल्यूडी च्या मैदानात हे कोरोना रूग्णालयांत वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकण्यात आली आहेत. मैदानाच्या कोपऱ्यात वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा खच पडल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.
महत्त्वाची बातमी : “वास मारणारं पॅकिंगचं निकृष्ठ अन्न खावं लागतं”, मुंबईकरांच्या मदतीला धावून आलेल्या ST कर्मचाऱ्यांचा टाहो
सीजीएस कॉलनीजवळ असलेल्या मैदानात आसपासच्या परिसरातील मुलं खेळण्यासाठी एकत्र जमतात. अशाच प्रकारे काही मुलं खेळण्यासाठी एकत्र आली असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. मैदानात फेकलेल्या कच-यात ब-याचदा वापरलेली इंजेक्शन,औषधांच्या रिकाम्या बाटल्या यांचा ही समावेश असतो. सुरूवातीला मुलांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून तो कचरा स्वता साफ केला. त्यानंतर मात्र हा प्रक्रार दररोज होऊ लागला.
गेल्या आठवड्याभरापासून हा प्रकार दररोज घडत असल्याचे येथील रहिवासी विनित शिंगारे यांनी सांगितले. पीपीई किटचा कचरा आम्ही स्वता दोनदा जाळला असल्याचे ही ते सांगतात. मात्र आता पीपीई किट सह मास्क, हातमोजे, इंजेक्शन, औषधांच्या बाटल्यांचा कचरा ही होऊ लागला आहे. कोरोना काळात शासन काळजी घेण्याचे सांगत असतांना अश्या प्रकारे उघड्यावर कचरा फेकल्याने रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी भिती ही शिंगारे यांनी व्यक्त केली.
महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण
जैविक कच-याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे म्हणालेत.
used PPE kits are thrown in open serious health issues may occur to the citizens
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023