Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सांगली जिल्ह्यात नवे 126 रुग्ण; 10 जणांचा मृत्यू; 429 लोक कोरोनामुक्त
Aapli Baatmi October 20, 2020

सांगली : जिल्ह्यात आज 126 जणांना कोरोनाची बाधा झाली. 2 हजार 344 जणांची तपासणी केली होती. दोन महिन्यांत पहिल्यांदा दिवसातील बाधितांची संख्या 200 हून कमी झाली आहे. जिल्ह्यातील आठ तर परजिल्ह्यातील 2 जणांचा मृत्यू झाला. उपचाराखालील रुग्णसंख्या 2 हजार 737 असून; एकूणच रुग्णालयांवरील ताण कमी झाल्याचे चित्र आहे
आज आरटीपीसीआर तपासण्या 876 झाल्या, त्यात 73 बाधित आढळले. अँटिजेन तपासण्या 1468 झाल्या, त्यात 54 बाधित आढळले. आटपाडी तालुक्यात 19, जतला 6, कडेगाव 9, कवठेमहांकाळ 4, खानापूर 8, मिरज 9, पलूस 14, तासगाव 15, वाळवा 15 तर महापालिका क्षेत्रातील 27 जणांना बाधा झाली आहे. त्यात सांगलीतील 18, तर मिरजेतील 9 जणांचा समावेश आहे.
जतमधील 1, कवठेमहांकाळमधील 1, पलूसमधील 1, शिराळ्यातील 1, तासगावमधील 3 तर महापालिका क्षेत्रातील 1 रुग्णाचा मृत्यू झाला. 341 जण ऑक्सिजनवर आहेत, नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 60, हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर 31 तर इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 7 रुग्ण आहेत.
परजिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे मिरजेत किंवा सांगलीत येऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आज केवळ एक रुग्ण बाधित आढळला. परजिल्ह्यातील 23 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सातारा येथील दोन जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील स्थिती
- आजचे बाधित ः 126
- उपचाराखाली ः 2737
- बरे झालेले ः 38545
- एकूण मृत्यू ः 1576
- एकूण बाधित ः 42858
- चिंताजनक ः 439
- ग्रामीण बाधित ः 20813
- शहरी बाधित ः 6283
- मनपा क्षेत्र ः 15762
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023