Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोरोनामुळे बोरगावात द्राक्ष बागांची छाटणी विलंबाने सुरू
Aapli Baatmi October 20, 2020

बोरगाव : भागात सध्या द्राक्ष छाटणीस प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनी आगाप छाटणी न घेता सप्टेबरमध्ये छाटणी घेण्यास पसंती दर्शवली. नैसर्गिक संकटाचा सामना करत, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी व कोरोनाशी लढा देत द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षबागेची छाटणी करत आहेत.
बोरंगाव, निंबळक, राजापूर, तुरची, लिंब, शिरगाव या परिसरात सध्या या कामाची धांदल दिसून येत आहे. गतवर्षी परिसरातील बागायतदारांनी जुलै, ऑगस्टमध्ये आगाप छाटण्या घेतल्या होत्या. मात्र, पावसामुळे तसेच दावण्याच्या प्रादुर्भावामुळे बागायतदारांना बागा मध्यंतरीच सोडून देण्याची वेळ आली. त्यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांना गतवर्षी मोठा आर्थिक फटका बसला होता.
त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत तसेच कोरोना संकट काळातील बाजारपेठेचा अंदाज घेत छाटणीस सुरवात केली आहे. प्रत्येक वर्षी या भागातून निर्यातक्षम द्राक्षे पिकवली जातात. सध्याचे वातावरण हे अद्यापही पावसाळी व धगमय असूनसुद्धा बागायतदार धाडस करून फळछाटणी घेत आहेत.
दरवर्षी बोरगाव परिसरात द्राक्ष उत्पादक संप्टेंबर महिन्यामध्ये आगाप छाटणी घेतात. मात्र यंदा कोरोना संकटकाळात द्राक्षांना मिळणारी बाजारपेठ व पावसाचा अंदाज घेत छाटणीस विलंब झाला असून आता बागायतदारांनी छाटण्या सुरू केल्या आहेत. परतीचा पाऊस, वातावरण बदल होत असल्याने शेतकरी सावध भूमिकेत आहेत.
– महादेव पाटील, द्राक्ष बागायतदार, शेतकरी.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023