Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
किळसवाणा प्रकार! डीश धुण्याच्या वॉश बेसिनमध्येच धुतले पनीर; स्वीट मार्टचा व्हिडिओ व्हायरल
Aapli Baatmi October 20, 2020

सिन्नर (जि.नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गावरील बसस्थानक परिसरातील एका झगमगीत बोर्ड लावलेल्या स्वीट मार्टमध्ये डीश धुण्याच्या वॉश बेसिनमध्येच ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांत टाकण्यात येणारे पनीर धुतले जात असल्याचा प्रकार मोबाईलद्वारे व्हायरल झाला.
स्वीट मार्टचा धक्कादायक प्रकार मोबाईलमध्ये व्हायरल
गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरातील या स्वीट मार्टचा कामगार खाली पडलेले पनीर शेवाळलेल्या बेसिनमध्ये स्वच्छ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये त्या स्वीट मार्टचे नाव स्पष्ट दिसत असल्याने तो शहरातील बसस्थानक परिसरातील असल्याचे आढळले. नाशिक-पुणे महामार्गावरील बसस्थानक परिसरातील एका झगमगीत बोर्ड लावलेल्या स्वीट मार्टमध्ये डीश धुण्याच्या वॉश बेसिनमध्येच ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांत टाकण्यात येणारे पनीर धुतले जात असल्याचा प्रकार मोबाईलद्वारे व्हायरल झाला आणि दुकानदाराला परिसरातील नागरिकांनी चोप दिला.
हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर
कामगारांसह मालकाला चोप
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच स्थानिक नागरिकांनी सोमवारी (ता. १९) संबंधित स्वीट मार्टच्या चालकाला चोप देत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत तंबी दिली. खात्री पटल्यानंतर सोमवारी (ता. १९) दुपारी तीनच्या सुमारास मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असा सगळा प्रकार तसाच दिसत होता. किचन पाहणी केली असता, जिथे पदार्थ बनतात त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी कामगारांना चोप दिला, तसेच काही काळ दुकान बंद करण्यास भाग पाडले.
हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023