Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
रस्त्यावर भरणाऱ्या आठवडी बाजारांसाठी आता खुल्या भुखंडांवर मंडई
Aapli Baatmi October 20, 2020

सांगली : शहरात विविभ भागात रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडा बाजारांचे खुल्या भूखंडावर स्थलांतर करण्यात येणार आहे. खुल्या भूखंडांची जागा निश्चित करा, असे आदेश आयुक्त नितीन कापडनीस यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
आयुक्त कापडनीस म्हणाले,””विविध भागात रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. बाजारातील गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे हे बाजार आता अडचणीचे ठरत आहेत. कोरोनामुळे रस्त्यावर भरणाऱ्या बाजारांमुळे संसर्गाचा धोका मोठा असल्याने रस्त्यावरील बाजारांना खुल्या भूखंडांवर स्थलांतरीत करण्याची गरज आहे.”
नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही तशी मागणी केली आहे. भाजी विक्रेत्यांच्या काही संघटनांनीही त्यासाठी तयारी दर्शविली आहे. सहायक आयुक्तांना लवकर भूखंड निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. जातील. तेथे भाजीमंडई केल्यास रस्ते मुक्त होतील.
दुर्गामाता दौडीला मज्जाव अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई बंद करण्यात आली आहे. त्याबद्दलही भाजी विक्रेते संघटनेच्या अध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे, नेते गौतम पवार यांनी आयुक्तांशी चर्चा केली. दौड रद्द झाल्याने नाहक रस्त्यावर पसरलेला भाजी बाजार मंडईत न्यावा अशी मागणी केली. कापडनीस यांनी तसे आदेश दिले.
विक्रेत्यांना जागा द्या
ऍड. स्वाती शिंदे, गौतम पवार यांनी आज आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मंडई सुसज्ज बांधून सुमारे दोनशे विक्रेत्यांचे तेथे कायम पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यांना रस्त्यावर बसणार नाही अशी हमी घ्यावी. त्यांना परवाने द्यावेत. त्यानंतरही जे रस्त्यावर बसतील. त्यांच्यावर कारवाई करावी. होलसेल विक्रेत्यांना गोकुळ नाट्यगृहाच्या जागेवर बहुमजली संकुल करून तेथे जागा द्यावी, अशी मागणी केली. यामुळे महापालिकेलाही उत्पन्न मिळेल, असे गौतम पवार म्हणाले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023