Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोरोनामुक्त झालेल्यांना विविध आजार : स्मृती पाटील; महापालिका सुरू करणार दहा पोस्ट कोविड सेंटर
Aapli Baatmi October 20, 2020

सांगली : महापालिकेने केलेल्या पाहणीत विविध आजार आढळून आले आहेत. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची शारीरिक क्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने आपल्या दहा अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरवर पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इतर आजारांमुळे त्यांना थकवा येणे, दम लागणे असे होत असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या सर्व्हेची आणि तपासणीची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय अधिकारी चारुदत्त शहा उपस्थित होते. या मोहिमेत पाच लाख 51 हजार 749 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोरोनाचे संशियत 1 हजार 262 रुग्ण सापडले. त्यातील 213 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले.
स्मृती पाटील म्हणाल्या, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना हृदय, फुप्फुस, किडनी आदी समस्या जाणवू लागल्या आहेत. डेंग्यू, चिकनगुण्याचाही त्रास होत आहे. रुग्णांना अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी याकडे दुर्लक्ष करू नये. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने दहा पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ ते दहा दिवसात ती सुरु होतील.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदशर्नाखाली “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम महापालिका क्षेत्रात राबवण्यात आली. पहिला टप्प्यात एक लाख 22 हजार 664 घरांचा 190 पथकांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली. या मोहिमेचा दुसरा टप्पा 24 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
अद्याप कोरोना संपला नाही
कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोना संपलेला नाही. दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण समोर आले आहेत. थंडीचा मोसम सुरु होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाही तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा, स्वच्छता ठेवावी, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले.
दृष्टिक्षेप
- एकूण नागरिकांची तपासणी : 5,51,749
- कोरोना संशयित रुग्ण : 1,362
- कोरोना पॉझिटिव्ह:- 213
- उच्च रक्तदाब : 18,009
- मधुमेह : 13,467
- इतर गंभीर आजार : 966
- गंभीर किडनीचा आजार : 55
- गंभीर फुप्फुसांचा आजार : 20
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023