Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
तब्बल १४२ दिवसांनतर शहरात कोरोनामुळे मृत्यू नाही; जिल्ह्यातील बाधितांची संख्या नव्वद हजार
Aapli Baatmi October 20, 2020

नाशिक : एकीकडे जिल्ह्यात नव्याने आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतांना, कोरोनाच्या बळींचे प्रमाण गेल्या काही दिवसांत घटल्याची दिलासादायक स्थिती आहे. मंगळवारी (ता.२०) नाशिक महापालिका हद्दीत एकाही रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तब्बल १४२ दिवसांनंतर शहरात दिवसभरात एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद आहे. मंगळवारी दिवसभरात ४३४ नवीन बाधित आढळले असून, ५५९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन रूग्णांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला आहे.
एकूण मृत्यूंचा आकडा १ हजार ६१३
गेल्या ३१ मेस नाशिक शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर दर दिवशी शहरातून किमान एकतरी कोरोनाचा बळी जात होता. मंगळवारी झालेल्या तीन मृत्यूंमध्ये निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ६१ वर्षीय पुरूष तर डोंगरगाव येथील ६५ वर्षीय महिला रूग्णाचा अशा नाशिक ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर मालेगाव महापालिका हद्दीत ६१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. यातून जिल्ह्यातील एकूण मृत्यूंचा आकडा १ हजार ६१३ झाला आहे.
हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर
नव्वद हजारांचा आकडा ओलांडला
दिवसभरात आढळलेल्या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३०८, नाशिक ग्रामीणचे १११, मालेगावचे दहा तर जिल्हाबाह्य पाच बाधितांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील २२६, नाशिक ग्रामीणचे २९१, मालेगावचे ३४ तर जिल्हाबाह्य आठ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला असून, आतापर्यंत ९० हजार ०७० बाधित आढळून आले आहेत. यापैकी ८१ हजार ९३७ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत ६ हजार ५२० बाधितांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात दाखल रूग्णांमध्ये नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात ९२७, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात ७१, मालेगाव महापालिका रूग्णालये १०, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात आठ तर जिल्हा रूग्णालयात तीन रूग्ण दाखल केले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ९९२ रूग्णांचे अहवाल प्रलंबित होते.
हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
संपादन – रोहित कणसे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023