Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
महावितरणकडून लातूर जिल्ह्यातील ३३ गावांत वीजचोरांविरुद्ध कारवाई
Aapli Baatmi October 20, 2020

लातूर : विजेची चोरी करून नियमित बिले भरणाऱ्या ग्राहकांची अडचण करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या निलंगा विभागाने कारवाई केली. विभागातील औसा, निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील ३३ गावांत मोहीम राबवत ५३६ जणांविरुद्ध विजेच्या चोरी प्रकरणी कारवाई केली. मोहिमेत शेगडी, हिटरसह वीज तारांवर आकडे टाकण्यासाठीची केबल वायर जप्त करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
या कारवाईमुळे विजेची चोरी करणाऱ्यांत खळबळ उडाली असून, कारवाईत वीज चोरी करताना सापडलेल्यांना त्यांनी चोरी केलेल्या वीजेचे बिल देण्याची कार्यवाही सुरू आहे. महावितरणचे निलंगा येथील कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे यांनी ही माहिती दिली. निलंगा विभागातील नागरसोगा, फत्तेपूर, धानोरा, लिंबाळा, नणंद, शिरोळ वांजरवाडा, यळनोर, चिंचोली, ममदापूर, बेलकुंड, मातोळा, वरवटासह ३३ गावांत चोरून वीजपुरवठा घेऊन शेगडी व हिटरचा सर्रास वापर सुरू होता. अनेकांकडून तारांवर आकडे टाकून विजेची चोरी सुरू होती. या प्रकारामुळे रोहित्रावर जादा भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यामुळे नियमित बिल भरून वीज घेणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. ग्राहकांकडून सातत्याने वीज चोरीबाबत तक्रारी सुरू होत्या. यामुळे विभागात वीज चोरीविरोधात मोहीम राबवण्याचा निर्णय घेऊन कार्यकारी अभियंता ढाकणे यांनी मोहिमेचे नियोजन केले. त्यानुसार ३३ गावात वीज चोरी करणाऱ्या ५३६ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत २२६ जणांकडील शेगडी आणि हिटर तर ३१० जणांनी आकडे टाकलेले वायर जप्त करण्यात जप्त करण्यात आले. या सर्वांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली असून, त्यांनी चोरी केलेल्या विजेची बिले ऑनलाइन वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे श्री. ढाकणे यांनी सांगितले. या मोहिमेत सर्व जनमित्रांसह औशाचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे, अविनाश सुळ, योगेश उटीकर, सुदर्शन बोळेगावे, नितीन लटपटे व सुशील देवडे यांनी भाग घेतला.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023