Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मंत्री अमित देशमुख रात्री उशिरापर्यंत बांधावर, पैठण, पाचोड तालूक्यातील शेतकऱ्यांना दिलासा
Aapli Baatmi October 20, 2020

आडूळ (औरंगाबाद) : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता.२०) पाहणी दौरा केला. त्यांनी पैठण तालुक्यातील मुरमा व औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगावात बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी शासन नियमानुसार नुकसान भरपाई देली जाईल, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांना धीर दिला.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पैठण तालुक्यातील मुरमा शिवारात एकनाथ मानमोडे, सोनाजी लेंभे यांच्या शेतात जाऊन कापसाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीसह धान्य वितरण, अनुदान आदींबाबत समस्या मांडल्या. त्या समस्या तत्काळ सोडवू, काळजी करू नका, असे आश्वस्त केले. औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव येथे संतोष मोरे यांच्या द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शासन योग्य ती नियमानुसार मदत करणार असल्याचे श्री. देशमुख यावेळी म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी पीक नुकसानीबाबत, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. या पाहणी दौऱ्यात माजी आमदार डॉ. कल्याण काळे, अनिल पटेल, मुरुमाचे सरपंच एकनाथ फटांगडे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, किशोर देशमुख, शेतकरी संतोष मोरे, भिमराव आबा डोंगरे, रविंद्र काळे, खरेदी विक्री संचालक दत्तु काका ठोंबरे, संदिपान पवार, विनोद देहाडे, शामबाबा गावंडे, सरपंच योगेश ठोंबरे, दिपक मोरे, अनिल मोरे, गोपीनाथ चवळी, गणेश गवळी, बाळु मोरे, तालुका कृषी आधिकारी जगताप, मंडळ अधिकारी किशोर वाघ, तलाठी शुभांगी शिंदे, ग्रामसेवक संतोष शेवंते यांची उपस्थिती होती. करमाड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील गोरे, अवेज शेख यांनी चोख बंदोबस्त
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पाचोड तालूक्यातील मुरमा येथे पाहणी, सरकार पाठीशी
पाचोड ‘अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीची पिकविम्यासह भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पावसामूळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने लवकर ४८ तासाच्या आत पूर्ण करावेत. तसेच ओढावलेल्या आस्मानी संकटाने शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची,’ ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मंत्री अमित देशमुख यांनी पाचोडजवळील मुरमा (ता. पैठण) येथे सोमवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतातील कापुस व अन्य पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत शासन नियमानुसार नुकसान भरपाई देणार असल्याची ग्वाही दिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मंत्री देशमुख यांनी चिखल तुडवित प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीने शेतातील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी रब्बी पेरणी करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती मंत्री देशमुख यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मंत्री देशमुख यांनी मुरमा येथे एकनाथ मानमोडे, बबन मापारी, सोनाजी लेंभे, बंडु मानमोडे व कल्याण मापारी यांच्या शेतात जाऊन कापसाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीसह धान्य वितरण, अनुदान आदींबाबत समस्या मांडल्या.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023