Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पुण्यासह राज्यात आज सरीवर सरी
Aapli Baatmi October 20, 2020

पुणे – पुणे-मुंबईसह राज्यातील 24 जिल्ह्यांत मंगळवारी (ता. 20) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तवला.
बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चक्रिय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत (ता. 24) पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडणार आहे. आज (ता. 20) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम आहे. दरम्यान, अरबी समुद्राच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराचा पश्चिम मध्य भाग व आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडणार आहे, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले. राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी काही प्रमाणात धुके पडत असल्याची स्थिती आहे.
या जिल्ह्यांत पडेल पाऊस
ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशीम.
मुसळधारेने झोडपले
पुणे शहराच्या विविध भागांना सोमवारी दुपारी मुसळधार सरींनी पुण्याला पुन्हा झोडपले. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता; पण दुपारनंतर आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे भरदुपारी अंधारून आले. त्यानंतर काही वेळातच पावसाच्या दमदार सरी कोसळू लागल्या. तासभर पाऊस बरसत होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे फक्त ढगाळ वातावरण होते. तेथे तुरळक सरींनी हजेरी लावली. तेथे 0.2 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दृश्य रस्त्यारस्त्यांवर दिसत होते.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023