Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
ताडोब्यात `बघिरा ॲप'ची पर्यटन वाहनांवर नजर
Aapli Baatmi October 20, 2020

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाहनांवर आता बघिरा ॲपची करडी नजर राहील. प्रकल्प व्यवस्थापनाकडून आजपासून सर्वच प्रवेशद्वारावर या ॲपची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रुडयार्ड किपलिंग या लेखकाने लिहीलेल्या जंगल बुक या पुस्तकातील बघिरा या एका कॅरेक्टरचे नाव या ॲपला दिले आहे.
ताडोबा प्रकल्पातील मोहर्ली, कोलारा, नवेगाव, खुटवंडा, झरी आणि पांगडी या सहा कोअर क्षेत्राच्या प्रवेशद्वारावर आलेल्या ५२ वाहनांना बघिरा ॲपचे मोबाईल देण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार जंगलात प्रवेश केल्यानंतर जिप्सीची गती २० किमी प्रतितास असणे गरजेचे आहे. मात्र, त्या नियमांचे उल्लंघन अनेकदा केले जाते. याशिवाय, पर्यटन रस्ते सोडून इतरत्र जिप्सी नेणे, एकाच ठिकाणी वाघ पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्यावर निर्बंध आणण्यासह, जिप्सीचा मागोवा घेणे, वाहनांची गती आणि नियमांचे उल्लंघन केले का हे या ॲपमुळे कळू शकेल.
उपवनसंरक्षक (कोअर) नंदकिशोर काळे म्हणाले, मध्यप्रदेशातील कान्हा, पेंच, बांधवगड या प्रकल्पात हे ॲप वापरण्यात येत आहे. त्याचा फायदाही झालेला आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे का, यावर नियंत्रण आणणे आणि वाहन चालकांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये हा यामागील उद्देश आहे. यासाठी आत्तापर्यंत ६५ पेक्षा अधिक मोबाईल खरेदी केलेले आहेत. आमचा उद्देश पर्यटकांना त्रास देणे नसून पर्यटन सुरळीत व्हावे हा आहे.
परतीच्या पावसाने झोडपले; आता पीक विमा कंपनी करतेय छळ; रडू रडू दु:ख व्यक्त करतोय शेतकरी
काही पर्यटक चालकांना वाघाजवळ जिप्सीला नेण्यास सांगणे आणि तेथून छायाचित्र काढणे असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्याबद्दल तुरळकच तक्रारी प्राप्त होतात. या मोबाईल ॲपमुळे मात्र, खरी माहिती पुढे येणार आहे. प्रकल्पात प्रवेश करणाऱ्या गाइडजवळ हा मोबाईल देण्यात येणार आहे. सफारी संपल्यानंतर तो मोबाईल प्रवेशद्वाराजवळ संबंधित वन कर्मचाऱ्यांना परत करायचा आहे. त्यात वाहन चालकांना नियमांचे उल्लंघन केले का हे कळणार आहे. हे ॲप बंगरुळु येथील आयटी कंपनीने ताडोबासाठी तयार केलेले आहे. ६ ऑक्टोबर रोजी या ॲपची ट्रायल घेण्यात आली होती. त्यानंतर आजपासून त्याचा वापर सुरू केला आहे. हा ॲप येण्यापूर्वी अनेक गाईड व जिप्सी चालकांनी मार्गदर्शक सूचनेनुसार काम सुरू केलेले आहे, असेही ते म्हणाले.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023