Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्ष सक्तमजूरी ; खानापूर तालुक्यातील घटना
Aapli Baatmi October 21, 2020

सांगली ः नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाळवणी (ता. खानापूर) येथील तौफिक उर्फ अमिनुल्ला सलीम मुल्ला (वय 24) याला वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आज सुनावण्यात आली. अतिरीक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. तसेच पीडित मुलीला शासनाने नुकसानीची रक्कम अदा करण्याचे ही निर्देश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारपक्षातर्फे वैशाली मुरचिटे यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, की पिडीत मुलगी तेरा वर्षाची आहे. आरोपी तौफिक नात्यातील आहे. पिडिता घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. यातून पिडीता गर्भवती राहिली. ही बाब तिच्या पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडितेविरुध्द लैंगिक अत्याचाराची बाब लक्षात आली. याप्रकरणी आरोपी तौफिक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात पिडीत मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व रासायनिक विश्लेषक आदीसह बारा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाने आरोपी तौफिक याला वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार दंड ठोठावला. विटा पोलिसांचे मोठे योगदान लाभले.
पहिलीच शिक्षा
अल्पवयीन मुलींवर, त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेवून होणारे लैंगिक अत्याचारास आळा बसण्यासाठी शासनाने 2018 साली भारतीय दंड संहिताचे कलम 376 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. सोळा वर्षाखालील अल्पवयींन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासाठी कमीत कमी वीस वर्षांच्या सश्रम कारावासाच्या कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे. न्यायालयाने प्रथमच या दुरुस्ती कलमानुसार आरोपीला शिक्षा सुनावली.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 years hard labor for abusing a minor girl; Incidents in Khanapur taluka
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023