Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कवठेएकंदला यंदा दसऱ्याची आतषबाजी रद्द; यात्राही नाही
Aapli Baatmi October 21, 2020

कवठेएकंद (जि . सांगली) : आपल्या धार्मिक भावना प्रथा आणि परंपरांचा प्रशासन म्हणून आम्ही आदर करतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे यात्रा आयोजित करणे हे लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी कवठेएकंदची यात्रा व आतषबाजी कोणत्याही परिस्थितीत होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मांडली.
दसऱ्यानिमित्त कवठेएकंद तालुका तासगाव येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व कवठेएकंद ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याला तहसीलदार कल्पना ढवळे, तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट, पोलीस उपनिरीक्षक विश्रांत मदने, कवठेएकंदचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी शिंगटे म्हणाले,” कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीमुळे हजारो नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. कोरोनाचा धोका संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत यात्रा पालखी सोहळा अथवा अतिषबाजी ला परवानगी दिली जाणार नाही. पंढरपूरची वारी असेल किंवा तासगावचा रथोत्सव असेल याठकाणी भाविकांनी घेतलेली सहकार्याची भूमिका कवठेएकंद ग्रामस्थांनी घ्यावी.
पुढील वर्षी प्रशासन आपल्याबरोबर पुन्हा उत्सवात सहभागी होईल.” पोलीस उपाधीक्षक शेंडगे यांनी सुरुवातीलाच शासनाच्या कसे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अटीवर यात्रेच्या आतषबाजीच्या निमित्ताने लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या आवाहनानंतर जर कोणत्याही प्रकारे कायदा मोडण्याचा नियम भंग करण्याचा प्रकार केल्यास, कायदा आपले काम करेल. समाजाच्या आपल्या कुटुंबाचा विचार करून प्रशासना बरोबर राहण्याची विनंती यावेळी अश्विनी शेंडगे यांनी केली.
ग्रामस्थांची सहकार्याची ग्वाही
बैठकीमध्ये ग्रामस्थांनी सोशल डिस्टंसिंग पाडत यात्रा आयोजित करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्याचबरोबर पालखी सोहळा आतषबाजी यासंदर्भात ग्रामस्थांची असणारी मागणी प्रशासनाकडे आग्रही पणे मांडली. मात्र, त्याचबरोबर प्रशासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचे त्याचबरोबर प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ही ग्वाही दिली.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023