Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नव्या रुग्णांची संख्या पन्नास हजाराच्या खाली
Aapli Baatmi October 21, 2020

नवी दिल्ली- कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात मंगळवारी सकारात्मक कल पहायला मिळाला.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात 46,791 नवे रुग्ण आढळले व 587 लोकांनी प्राण गमावले. जुलैनंतर आज प्रथमच म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली आहे. बरे होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल क्रमांकावर आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशात उपचाराखालील रूग्णसंख्या 7 लाख 48 हजार 538 झाली आहे. त्यात कालपासून 23,517 ने घट झाली. या संख्येपेक्षा कोरोनाला हरवून बरे होणाऱ्यांची संख्या 60 टक्क्यांनी जास्त आहे. आतापर्यंत 67,33,329 भारतीय बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व आंध्र प्रदेशातही उपचाराखालील रूग्णसंख्येत घट नोंदविली गेली आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र. तमिळनाडूतील स्थिती गंभीरच
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतील कोरोनाची परिस्थिती अद्याप गंभीर आहे. मात्र कोरोना चाचण्या व दर 100 चाचण्यांमागे नवीन संक्रमितांची संख्या या बाबतीत अविकसित समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व आसाम या राज्यांनी वरील विकसित राज्यांवरही आघाडी घेतल्याचे गेल्या 14 दिवसांतील आकडेवारी सांगते. या चारही राज्यांत कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट जेमतेम 2 टक्के राहिला आहे. चाचण्यांच्या बाबतीत बिहारने दिल्लीला व उत्तर प्रदेशाने महाराष्ट्रालाही मागे टाकले असून तेथे दिल्लीच्या दुप्पट चाचण्या होत आहेत.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023