Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कमलनाथ यांचे वक्तव्य दुर्दैवी - राहुल गांधी
Aapli Baatmi October 21, 2020

वायनाड – मध्यप्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी तेथील मंत्री इमरती देवी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आज नाराजी व्यक्त केली तसेच त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजपनेही याच मुद्यावरून राजकारण करायला सुरवात केल्याने अखेर कमलनाथ यांनीही माघार घेत या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्या केरळच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘‘ एखादी व्यक्ती महिलेचा अशा पद्धतीने अनादर करू शकत नाही. कमलनाथजी हे माझ्या पक्षाचे आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली ती व्यक्तिशः ः मला आवडलेली नाही, त्यांचे ते विधान दुर्दैवीच आहे.’’ मध्यप्रदेशात सध्या पोटनिवडणुकीची हवा चांगलीच तापली असून ग्वाल्हेरमधील डाबरा शहरात आयोजित प्रचारसभेत बोलताना कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याच मुद्यावरून कमलनाथ यांच्याविरोधात आंदोलनही केले होते. राष्ट्रीय महिला आयोगानेही याच मुद्यावरून कमलनाथ यांना नोटीस बजावत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याआधीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान आयटम हा शब्द वापरण्यात आला होता. यावेळेस भाजपने मात्र लोकांचे लक्ष वळविण्यासाठी या वादाला वेगळे वळण दिले. भाजपला पोटनिवडणुकीतील पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने त्यांनी हा वाद निर्माण केला. मला कुणाचाही अनादर करायचा नव्हता.यावरून मी कुणाचीही माफी मागणार नाही.
– कमलनाथ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023