Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
झोपडपट्टीधारकांना वगळा, उपयोगकर्ता कर रद्द करा
Aapli Baatmi October 21, 2020

सांगली : घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कोणतीही सुविधा न देता महापालिकेने उपयोगकर्ता कर लागू केला आहे. तो तातडीने रद्द करावा अशी मागणी मदनभाऊ युवा मंचच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
पालकमंत्री पाटील यांना युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कचरा संकलन करणे, त्याचे वर्गीकरण करणे, सार्वजनिक आरोग्यस धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहे उभारणे, कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे, महापालिकेच्या संकेतस्थळावर कचरा संकलनाचे वेळापत्रक करणे आदी विविध सुविधा करण्याचे नियम आहेत.
या सर्व सोई दिल्यानंतरच कचरा व्यवस्थापन सेवा दिल्यापोटी अनुसूचि एकमध्ये नमूद दराने उपयोगकर्ता शुल्क वसुल करू शकतात, मात्र महापालिका यातील कोणतीही सेवा पूर्ण क्षमतेने करत नसताना उपयोगकर्ता कर वसूल करत आहेत ही अन्यायकारक बाब आहे. झोपडपट्टीमध्ये 57 रूपये ते 125 रूपये वार्षिक घरपटटी असताना वार्षिक 600 रुपये उपयोगकर्ता कर लावण्यात आला आहे. त्यात दरवर्षी पाच टक्के वाढ प्रशासनाने सुचवलेली आहे. यातून 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना स्वच्छता करातून वगळण्यात यावे. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, मयूर बांगर, अवधूत गवळी, नितीन भगत, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023