Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पहिल्या हप्त्याच्या दराची कोंडी कोण फोडणार?
Aapli Baatmi October 21, 2020

नवेखेड : सांगली जिल्ह्यात साखर कारखान्याची गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्यात आली असली, तरी पहिल्या हप्त्याची दराची कोंडी कोण फोडणार याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता ताणली आहे.
गाळप हंगामाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या पर्शवभूमीवर कारखान्यांनी तोडणी मजुरांच्या आरोग्यासाठी ही उपाययोजना केल्या आहेत. पावसाने उघडीप दिली की ऊस तोडणी सुरू होईल अशी चिन्हे आहेत. या सर्वांच्या पर्शवभूमीवर जिल्ह्यातील कोणता कारखाना पहिल्या हप्त्याची कोंडी फोडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अलीकडील काही वर्षांत दरासाठीच शेतकरी संघटनाचा संघर्ष सौम्य बनला आहे. केंद्राने ठरवून दिलेली एफ आर पी करखाण्याकडून कशी मिळेल या साठीच पाठपुरावा करावा लागत आहे.काही कारखान्यानी गतवर्षाची एफ आर पी अजूनही पूर्ण केली नसल्याची उदाहरणे आहेत.
मागील आठ दहा वर्षांत सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे ऊस दर वाढ आंदोलनासाठी आघाडीवर असायचे.आता साखर कारखान्यांना पूर्ण एफ आर पी न दिल्यास कायद्याचा बडगा सरकार उगारते.ही वस्तुस्थिती आहे.सध्या सात आठ महिने सुरू असलेली कोरोना महामारी,अतिवृष्टी मुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांची यावर्षी गाळपासाठी जाणाऱ्या उसाची एफआरपी एक रकमी मिळावी अशी मागणी आहे. पूर्वी साखर कारखाने जादा साखर उतारा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असायचे. सध्या हा मुद्दा फारसा गांभिर्याने कोण घेत नसल्याचे चित्र आहे. फक्त गाळप कसे वाढेल या साठी प्रयत्न केले जातात.
याबाबत विभागीय साखर सहसंचालक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मागील वर्षाचा सरासरी उतारा आणि त्या कारखान्याचा तोडणी वाहतूक खर्च वजा जाता येणारी रक्कम हा त्या कारखान्याचा एकूण दर बसतो. ही माहिती पडताळणी केली असता हा प्रति टन 2500 ते 3100 पर्यंत हा दर जातो. काही कारखाने जादा ऊस गळीतास मिळावा यासाठी चढा दर देतात. असे असले तरी हा दर प्रति टन 50 ते 100 इतकाच पुढे मागे असतो, असे त्यांनी सांगितले. यावर्षी विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला एक रकमी एफआरपी मिळणार का आणि दराची कोंडी कोण फोडणार हा विषय महत्वाचा आहे.
सांगली जिल्ह्यात हुतात्मा, राजाराम बापू, क्रांती हे साखर कारखाने नेहमी चांगल्या दरासाठी चर्चेत आहेत. त्याचबरोबर सोनहिरा, विश्वास, दत्त इंडिया (शेतकरी, सांगली) निनाईदेवी, मोहनराव शिंदे, उदगिरी शुगर ,राजेवाडी या साखर कारखान्यांनी बऱ्यापैकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. साखर कारखान्यांना प्रति क्विंटल 3600रु पये एमएसपी मिळावी. साखर निर्यातीचे अनुदान कारखान्यांना त्वरित मिळावे. केंद्राकडून कारखान्याचे अडकलेले पैसे मिळावेत. एफआरपी प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना मिळेल.
– वैभव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा साखर कारखाना
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023