Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
शेतकरी वाचविण्यास सरकारने तिजोरी उघडावी : राजू शेट्टी
Aapli Baatmi October 21, 2020

जत (जि. सांगली) : कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांसोबत जनावरेही मृत्यूमुखी पडलीत. शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणारे नाही. आर्थिक मदतीची गरज आहे. शेतकरी वाचवण्यासाठी तिजोरी उघडी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी शेट्टी यांनी केली. अचकनहळ्ळी येथे विनायक शिंदे यांची बैल जोडी पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तुकाराम बाबा महाराज, रमेश माळी, आबा गावडे, पिंटू मोरे, शहाजी साळे, सुधीर माळी, भैरव माळी, शिवाजी पाटील, दामाजी दुबळ, सूरज पाटील, महेश जगताप, निखिल कारंडे, मारुती देवकर, सुरेश पाचिब्रे आदी व शेतकरी उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले,””अवकाळीने शेतीचे नुकसान झाले. पशुधन व मनुष्यहानीही झाली. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला. पुन्हा अवकाळीने कंबरडे मोडले. त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्याने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, पंचनाम्याचा बागुलबुवा न करता सर सकट हेक्टरी तातडीने 25 हजार मदत द्यावी. सध्या केंद्र मदत देताना पक्षपातीपणा करीत आहे.
राष्ट्रीय आपत्ती निधीतून त्यांची सत्ता ज्या राज्यात आहे त्यांना तातडीने निधी दिला जातो. अन्य राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. तर रस्त्यावर उतरावे लागेल.”
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023