Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मॉन्सूनचा परतीचा प्रवास शनिवारपासून सुरू होणार
Aapli Baatmi October 21, 2020

पुणे – राज्यात पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शनिवारपासून (ता. 24) मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. पुढील दोन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते तीव्र पावसाच्या सरी पडतील, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले.
बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पाठोपाठ बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा थेट प्रभाव राज्यावर होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशात परतीच्या पावसाचा प्रवास उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून सुरू आहे. काही दिवसात या राज्यांमधील उर्वरित भागांमधूनही मॉन्सूनच्या परतीचा प्रवास पूर्ण करेल. त्यानंतर महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मॉन्सूनला माघार घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांत पोषक स्थिती बनणार आहे. चालू वर्षी हवामान खात्याने नवीन अंदाजानुसार पाच ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले 15 दिवस मॉन्सून रेंगाळला आहे.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत असून हवा कोरडी होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस न पडल्यास अरबी समुद्र आणि राज्याच्या उत्तर भागातून पाऊस माघार घेण्याची शक्यता आहे. चार ते पाच दिवसांत विदर्भाच्या अनेक भागातून पाऊस माघार घेणार आहे, अशी माहितीही हवामान शास्त्रज्ञांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023