Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सरपंचपद ते भाजपचा राजीनामा, जाणून घ्या एकनाथ खडसेंचा 40 वर्षाचा खडतर राजकीय प्रवास
Aapli Baatmi October 21, 2020

मुंबई : महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे एक वजनदार नेते होते. भाजपाचा राज्यामध्ये विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्ष नेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.
2014 मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच खडसे नाराज होते. मागच्या काही वर्षांपासून ते भाजपाच्या सक्रीय राजकारणातून बाजूला पडले होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना होती. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास
- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला.
- एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली.
- ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- त्यानंतर 1987 साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले.
- 1989 साली भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
- 1980 साली भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
- ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली.
- महाराष्ट्रात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ-सिंचन ही खाती संभाळली.
- नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोंबर 2014 या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे.
- पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी तीन जून 2016 रोजी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही.
- खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकिट दिले. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला.
- 2019 पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली.
- आज 21 ऑक्टोबर, 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.
( संपादन – सुमित बागुल )
from sarpanch to revenue minister political journey of eknath khadase so far
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from sarpanch to revenue minister political journey of eknath khadase so far
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023