Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
NCP मधील एक मंत्री खडसेंसाठी पद सोडणार ? नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं ? चर्चा तर होणारच !
Aapli Baatmi October 21, 2020

मुंबई : भाजपाचे सर्वात जेष्ठ, जुने जाणते नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पक्ष सोडावा लागला असं परखड मत माध्यमांसमोर मांडलं आहे. मला पक्षात मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न केला गेल्याचंही एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अधीरेखित केलं.
तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडून जाऊ नये असं आम्हाला वाटत होतं, असं भाजपातील नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळालेला आहे. भाजपकडून एकनाथ खडसे याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं पत्रकार परिषद घेत सांगण्यात आलंय.
महत्त्वाची बातमी : नाथाभाऊंना भाजपकडून शुभेच्छा ! राजीनामा मिळाल्यानंतर भाजपाची अधिकृत प्रतिक्रिया वाचा
कोणतं पद ? कोणतं खातं ? चर्चा तर होणारच !
आता एवढा मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हंटल्यावर त्यांना कोणतं पद किंवा खातं दिलं जातं याबाबत चर्चा तर होणारच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका मंत्र्यांचं खातं एकनाथ खडसे यांना दिलं जाणार असल्याची चर्चा आता राजकीय परिघात सुरु झालीये. राष्ट्रवादीमधील एका मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल असं सूत्रांकडून समजतंय. सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीप्रमाणे एकनाथ खडसे यांना कोणत्या जबाबदाऱ्या द्यायच्या याबाबत राष्ट्रवादीमध्ये चर्चा झालेली आहे. यानुसार एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ आमदारांच्या राज्यपालांकडे शिफारसी करण्याचं ऐन वेळी थांबवण्यात आलेलं. त्याच कारण म्हणजे एकनाथ खडसे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी देता येईल अशी चर्चा सुरु असल्याचं समजतंय. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देऊ शकतो असं बोललं जातंय. जो मंत्री राजीनामा देईल त्यांची वर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर लागू शकते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय.
महत्त्वाची बातमी : पोस्ट कोविड आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रूग्णालयांचा ‘रिकव्हरी क्लिनिक’वर भर
दरम्यान एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर भाजप विरुद्ध खडसे असा जंगी सामना रंगताना पाहायला मिळेल असंही राजकीय विश्लेषक म्हणतायत.
one minister from NCP to resign his post for eknath khadse says sources
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023